शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 23:25 IST

कोरोना व्हायरसमुळे खळबळ उडाली असताना रेल्वे रुग्णालयाने कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत.

ठळक मुद्देनागपूरच्या रेल्वे रुग्णालयात सुविधा : प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसमुळे खळबळ उडाली असताना रेल्वे रुग्णालयाने कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत. महिला आणि पुरुष रुग्णांसाठी प्रत्येकी २० या प्रमाणे ४० जणांना ठेवण्याची सुविधा या वॉर्डमध्ये रेल्वे रुग्णालयाने केली आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण १७ हजार रेल्वे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. तर नागपूर रेल्वेस्थानकावरून दिवसाकाठी १५० प्रवासी रेल्वेगाड्या ये-जा करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांना कोरोना व्हायरसबद्दल माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाच दिवसांपासून ध्वनिक्षेपकाहून सूचना देणे सुरू केले आहे. याशिवाय रेल्वेस्थानकावर स्टिकर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. परंतु केवळ जनजागृती करून चालणार नसून एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला ठेवण्यासाठी विशेष वॉर्ड असणे गरजेचे असल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या ध्यानात आली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुग्णालयात संशयित कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत. यात एक वॉर्ड महिलांसाठी तर दुसरा पुरुषांसाठी तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये प्रत्येकी २० खाटा राहणार आहेत. कोरोनाचा संशयित रुग्ण अथवा प्रवासी आढळल्यास त्यास या वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचे नमुने घेऊन ते खासगी रुग्णालयात पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित रुग्ण या वॉर्डमध्ये भरती ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे.संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी रेल्वे रुग्णालय सज्ज‘कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जनजागृती सुरू केली आहे. परंतु एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला ठेवण्याची व्यवस्था रेल्वे रुग्णालयात नव्हती. त्यामुळे संशयित रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.’एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :corona virusकोरोनाrailwayरेल्वेhospitalहॉस्पिटलnagpurनागपूर