शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूचे दोन बळी : नागपूरच्या गोरेवाडा परिसरात २५ वर रुग्णांची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:45 IST

नववर्षात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गोरेवाडा परिसरात या आजाराचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून २५वर संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूबाबत वाढत्या भीतीच्या वातावरणाला घेऊन शुक्रवारी असंघटित कामगार काँग्रेसच्यावतीने परिसरातील संतप्त नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देनागरिकांकडून महापौरांना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्षात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गोरेवाडा परिसरात या आजाराचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून २५वर संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूबाबत वाढत्या भीतीच्या वातावरणाला घेऊन शुक्रवारी असंघटित कामगार काँग्रेसच्यावतीने परिसरातील संतप्त नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली.प्रफुल्ल मेंढे (३०) रा. गोरेवाडा व श्रीमती रामटेके (४५) रा. बोरगाव असे मृताचे नाव असल्याचे या आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या नावाची अद्यापही नोंद झालेली नाही.असंघटित कामगार काँग्रेसचे नागपूर उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद लाहोरी यांनी सांगितले, गोरेवाडा परिसरात सध्याच्या स्थितीत २५वर रुग्ण स्वाईन फ्लू संशयित आहेत. यातील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विषयाला घेऊन महापौर जिचकार यांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली. परंतु त्यांना विषयाचे गांभीर्य नसल्याने वेळ मारून नेली. बुधवारपर्यंत मनपाकडून विशेष सोयी उपलब्ध न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही लाहोरी यांनी दिला. आंदोलनात दुर्गाप्रसाद लाहोरी यांच्यासह मोनु मेंढे, युगल विधावत, गुड्डू नेताम, नीलिमा दुपारे यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.मनपा दवाखान्यात औषधे नाहीतमृत प्रफुल्ल मेंढे यांचे भाऊ मोनु मेंढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ७ जानेवारी रोजी प्रफुल्लचा रामदासपेठ येथील एका खासगी इस्पितळात मृत्यू झाला. त्याच दिवशी मानकापूर येथील एका खासगी इस्पितळात श्रीमती रामटेके यांचा मृत्यू झाला. या शिवाय गोरेवाडा परिसरात अनेक स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आहेत. या आजाराचे रुग्ण वाढत असताना मनपाचे आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. गोरेवाडातील महापालिकेच्या दवाखान्यामध्ये स्वाईन फ्लूची औषधे नाहीत. रुग्णांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते. आजाराबाबत डॉक्टर मार्गदर्शन करीत नाही. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही मेंढे म्हणाले.गेल्या वर्षात ११ मृत्यूशहरात २०१८ या वर्षात स्वाईन फ्लूचे ६३ रुग्ण व ११ मृत्यूची नोंद आहे. तर २०१७ मध्ये ऐन उन्हाळ्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. नागपूर विभागात या वर्षांत ६३४ रुग्ण तर ११९ रुग्ण बळी पडले. २०१८ मध्ये विभागात ११० रुग्ण १८ मृत्यूची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू