नागपूर विभागाला मिळाल्या दोन गाड्या

By Admin | Updated: May 9, 2014 02:16 IST2014-05-09T02:16:17+5:302014-05-09T02:16:17+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला दिलेल्या दोन गाड्या परत मिळाव्यात, यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केलेल्या आंदोलनाला यश आले असून, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला आपल्या दोन गाड्या परत मिळाल्या आहेत.

Two trains got by Nagpur division | नागपूर विभागाला मिळाल्या दोन गाड्या

नागपूर विभागाला मिळाल्या दोन गाड्या

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला दिलेल्या दोन गाड्या परत मिळाव्यात, यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केलेल्या आंदोलनाला यश आले असून, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला आपल्या दोन गाड्या परत मिळाल्या आहेत.
आमला-छिंदवाडा हा सेक्शन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आहे. या सेक्शनमध्ये धावणार्‍या आमला-छिंदवाडा-आमला या दोन गाड्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मागितल्या. या मोबदल्यात गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस या दोन गाड्या नागपूरला देण्याचे मंजूर केले. परंतु नागपूर विभागाला अद्यापही या दोन गाड्या मिळाल्या नाहीत. यामुळे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने लोकोपायलट, गार्ड लॉबीसमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन केले होते. आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला दिलेल्या या दोन्ही गाड्या परत घेतल्या.
यामुळे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या आंदोलनाला यश आले आहे. 'सीआरएमएस' भ्रष्टाचार्‍यांना वाचविण्यासाठी आंदोलन करीत नसून, समाजाच्या हितासाठी आंदोलन करीत असल्याचे संघटनेचे विभागीय सचिव विनोद चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two trains got by Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.