लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रॅपिड अॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. बुधवारी यात ४९ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १९१४ वर पोहचली. यात तीन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३० झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यवर्ती कारागृहात रॅपिड चाचणीमुळे २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर कामठीत १३ रुग्णांची नोंद झाली.जून महिन्यात आठ दिवसात पाच मृत्यूची नोंद झाली. आज नोंद झालेल्या तीन मृतांमध्ये दोन मेयो तर एक मेडिकलचा रुग्ण होता. मध्य प्रदेशातील सिवनी येथील ६८ वर्षीय रुग्णाचा मेयोमध्ये उपचार सुरू असताना मध्यरात्री मृत्यू झाला. या रुग्णाला टाईप टू मधुमेह व इतरही आजार होते. दुसरा रुग्ण हा ७१ वर्षीय अमरावती येथील राहणारा होता. या रुग्णालाही टाईप टू मधुमेह, उच्चरक्तदाब व इतरही आजार होते. मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना या रुग्णाचा आज मृत्यू झाला. तर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला धरमपेठ येथील ७३ वर्षीय रुग्णाचे नमुने खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. या रुग्णाला श्वसनाचा गंभीर आजार होता. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना आज दुपारी मृत्यू झाला.कारागृहातील पुन्हा २१ पॉझिटिव्हमध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी व आता बंदिवान मोठ्या संख्येत पॉझिटिव्ह येत आहेत. आज पुन्हा २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात काही बंदिवान असल्याचे सांगण्यात येते. कारागृहात आतापर्यंत १४७ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वच बंदिवानाची रॅपिड अॅण्टीजेन चाचणी होणार असल्याने लवकरच कारागृहात किती रुग्ण आहेत ते सामोर येण्याची शक्यता आहे.शहरात या भागात आढळून आले रुग्णएम्सच्या प्रयोगशाळेत १०, मेयोच्या प्रयोगशाळेत आठ, नीरीच्या प्रयोगशाळेत चार तर खासगी लॅबमधून सहा व कारागृहातून २१ असे ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण सोमवारीपेठ, मिनीमातानगर, भगवाघर चौक, कोराडी रोड, जाफरनगर, सुभेदार ले-आऊट, जुनी मंगळवारी, काटोल रोड, राजनगर व हिंगणा रोड या भागातील आहेत. याशिवाय मेयो रुग्णालयातून ११ तर मेडिकलमधून चार असे १५ रुग्णांंना सुटी देण्यात आली. आतापर्यंत १४०० रुग्ण बरे झाले आहेत.ग्रामीण भागात रुग्णांची संख्या २८२शहरासोबतच ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. विशेषत: कामठी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कामठी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २० वर पोहोचली आहे. महानिर्मितीच्या कोराडी वीज वसाहतीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वीज केंद्रात कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याची नातेवाईक असलेली तरुणी दोन दिवसापूर्वी हैदराबाद येथून वीज वसाहतीत आली होती. मंगळवारी रात्री तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ग्रामपंचायत दवलामेटी अंतर्गत येणाऱ्या हिलटॉप कॉलनीमधील ३२ वर्षीय तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही तरुणी मध्यवर्ती कारागृहात संगणक कर्मचारी म्हणून काम करते.संशयित : १९८८अहवाल प्राप्त : २८०५३बाधित रुग्ण : १९१४घरी सोडलेले : १४००मृत्यू : ३०
CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची दोन हजाराकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 22:55 IST
रॅपिड अॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे.
CoronaVirus in Nagpur : नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची दोन हजाराकडे वाटचाल
ठळक मुद्दे४९ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू : रुग्णसंख्या १९१४ : मृतांची संख्या ३० : कामठीत १३ रुग्ण