शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

उत्तर प्रदेशातील चोरट्यांची जोडगोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:19 IST

मोबाईल शॉपी फोडून लाखोंचे मोबाईल्स चोरणाऱ्या एका सराईत जोडगोळीला नंदनवन पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन जेरबंद केले. यातील मुख्य आरोपीचे नाव अभिजित ऊर्फ अपजित सोमनाथ पांडे (वय २९) आहे. तो राजनगर वाठोडा येथे भाड्याच्या खोलीत राहतो. त्याच्यासोबत त्याचा साळाही आरोपी आहे. मात्र, तो अल्पवयीन आहे. साळ्या-भाटव्याच्या या जोडगोळीकडून लाखोंचे मोबाईल्स जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देएका महिन्यात सहा चोऱ्यापाच लाखांचा ऐवज जप्तनागपूरच्या नंदनवन पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल शॉपी फोडून लाखोंचे मोबाईल्स चोरणाऱ्या एका सराईत जोडगोळीला नंदनवन पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन जेरबंद केले. यातील मुख्य आरोपीचे नाव अभिजित ऊर्फ अपजित सोमनाथ पांडे (वय २९) आहे. तो राजनगर वाठोडा येथे भाड्याच्या खोलीत राहतो. त्याच्यासोबत त्याचा साळाही आरोपी आहे. मात्र, तो अल्पवयीन आहे. साळ्या-भाटव्याच्या या जोडगोळीकडून लाखोंचे मोबाईल्स जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. 

१८ जूनला वाठोड्यातील मोहम्मद सैफ यांच्या मालकीची एमएस इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी तेथून वेगवेगळ्या कंपनीचे ४० मोबाईल्स आणि रोख रक्कम असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला होता. नंदनवन ठाण्याच्या हद्दीतीलच बीडगाव येथील सुमन मोबाईल्स शॉपीसुद्धा फोडण्यात आली होती. येथूनही चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरले होते. या धाडसी चोऱ्यांमुळे परिसरातील व्यापाऱ्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त रौशन आणि नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी सायबर सेलचे कर्मचारी दीपक तऱ्हेकर तसेच मिथून नाईकच्या मदतीने तपासचक्र फिरविले. घटनेच्या वेळी आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि त्यानंतरचे लोकेशन तपासले असता, या घरफोडीतील आरोपी उत्तर प्रदेशमधील फतेपूर जिल्ह्यात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पीएसआय दत्ता पेंडकर आणि सागर भास्कर हे आपल्या सहकाऱ्यांसह उत्तर प्रदेशातील फतेपूर जिल्ह्यातील ग्राम चक्की मलवाव येथे पोहचले. तेथून पोलिसांनी आरोपी अभिजित पांडे आणि त्याच्या अल्पवयीन साळ्याला ताब्यात घेतले. या दोघांकडून चार लाखांचे मोबाईल तसेच चोरीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.चोरी आणि पळून जाण्याचे तंत्रआरोपी अभिजित पांडे हा अत्यंत धूर्त चोरटा आहे. तो सुशिक्षित असून त्याला सीसीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनबाबतही माहिती आहे. पोलीस या आधारेच गुन्ह्याचा छडा लावतात, हे माहिती असल्याने पांडे सर्वप्रथम अंधाºया गल्लीबोळातून जाऊन सीसीटीव्हीच्या डीव्हीआरची वायर तोडायचा. तत्पूर्वी दिवसा वाहन चालवताना कुठे चोरी करायची, ते ठरवायचा आणि रात्री आपल्या १७ वर्षीय साळ्याला घेऊन चोरी-घरफोडी करायचा. त्याने साळ्यालाही झटपट चोरी, घरफोडी कशी करायची, त्याचे तंत्र शिकविले होते. पोलिसांनाच नव्हे तर पोलिसांच्या श्वानाला कसा गुंगारा द्यायचा, त्याबाबतही त्याने साळ्याला टीप्स दिल्या होत्या. श्वानाला संभ्रमित करण्यासाठी चोरीच्या ठिकाणापासून काही अंतरावर तो नुसता गोल गोल फिरत होता. चोरी केल्यानंतर तो रेसर बाईक पळवावी त्या वेगाने एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात पळून जात होता. मात्र, आम्ही त्याच्यावर मात करून त्याला अटक करण्यात यश मिळवल्याचेही उपायुक्त रौशन यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिसांनी पांडे आणि त्याच्या मेव्हण्याकडून नंदनवन, हुडकेश्वर आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या सहा गुन्ह्यांचा छडा लावल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtheftचोरीArrestअटक