दोन तडीपार गुंडांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST2021-05-17T04:07:07+5:302021-05-17T04:07:07+5:30

नागपूर : सीताबर्डी पोलिसांनी सापळा लावून तीन तासांत दोन तडीपार गुंडांना अटक केली. निखिल ऊर्फ मोंटी मुकेश मलिक (वय ...

Two Tadipar goons arrested | दोन तडीपार गुंडांना अटक

दोन तडीपार गुंडांना अटक

नागपूर : सीताबर्डी पोलिसांनी सापळा लावून तीन तासांत दोन तडीपार गुंडांना अटक केली. निखिल ऊर्फ मोंटी मुकेश मलिक (वय २१) आणि लक्ष ऊर्फ लकी संजय तुर्केल (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मोंटी मलिक हा मरियम नगरात राहतो. तो कुख्यात गुंड असून, त्याला नागपुरातून हद्दपार करण्यात आले आहे. तरीसुद्धा मोंटी नागपुरातच राहत असल्याचे पोलिसांना कळले होते. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो मीठा नीम दर्गा येथे दर्शनाला येत असल्याची माहिती सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपी मोंटी मलिकला शनिवारी सायंकाळी सहा वाजता ताब्यात घेतले. या कारवाईपूर्वी दुपारी तीन वाजता कुख्यात गुंड लक्ष ऊर्फ लकी तुर्केल हा तडीपार गुंड त्याच्या मरियम नगरातील घरी आल्याचे कळताच पोलिसांनी तेथे छापा घालून लकीला अटक केली. या दोन्ही गुंडांवर तडिपारी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले.

Web Title: Two Tadipar goons arrested