शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरहून मुंबईसाठी दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन; प्रवाशांची गर्दी वाढली

By नरेश डोंगरे | Updated: October 14, 2022 18:18 IST

दिवाळी तोंडावर असल्याने प्रवाशांची रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे.

नागपूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूरहून मुंबईसाठी दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक ट्रेन शनिवारी १५ तर, दुसरी १८ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.

दिवाळी तोंडावर असल्याने प्रवाशांची रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. ती लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन-वे स्पेशल (ट्रेन नंबर ०१०७६) विशेष शुल्कावर सुरू केली आहे. ती नागपूर स्थानकावरून १५ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता सुटेल आणि १६ ऑक्टोबरच्या पहाटे ४ वाजता मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०१०७८ ही नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वन-वे स्पेशल रेल्वेगाडी १८ ऑक्टोबरला दुपारी १.३० नागपूर स्थानकावरून निघेल आणि १९ ऑक्टोबरला पहाटे ३.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या प्रवासादरम्यान वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकावर थांबून प्रवाशांची ने-आण करेल.

अशी राहील सुविधाया दोन्ही स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये दोन एसी २ टियर, ८ एसी ३ टियर, ४ शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असतील. यात एका गार्ड व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचाही समावेश आहे.

टॅग्स :railwayरेल्वे