दोघांनी लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST2020-12-14T04:25:30+5:302020-12-14T04:25:30+5:30

अजनीतील तरुणाचे नाव अनिकेत वसंतराव बावनकुळे (वय ३०) असून तो बजरंग नगरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार त्याचे वडील किराणा ...

The two strangled | दोघांनी लावला गळफास

दोघांनी लावला गळफास

अजनीतील तरुणाचे नाव अनिकेत वसंतराव बावनकुळे (वय ३०) असून तो बजरंग नगरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार त्याचे वडील किराणा दुकान चालवितात तर अनिकेत गॅस एजन्सीत कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्याने ग्रासला होता. त्या अवस्थेत त्याने शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांसाठी आपण काही करू शकलो नाही, अशी खंत त्याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली. मिळालेल्या माहितीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

दुसरी घटना डोबीनगर, मोमीनपुऱ्यात घडली. मोहम्मद फुरकान मोहम्मद असलम (वय २४) याने शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. मोहम्मद असलम मोहम्मद नजिर अन्सारी (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: The two strangled