शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 1:20 AM

एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या दुष्काळामुळे घेतला निर्णय : रिक्त जागांची डोकेदुखी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.दत्ता मेघे पॉलिटेक्निकची स्थापना १९८३ साली झाली होती, तर ‘केडीके’ नागपूर पॉलिटेक्निकची स्थापना काही काळाने झाली. सुरुवातीच्या काळात या महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. मात्र बदलत्या काळानुसार ‘पॉलिटेक्निक’कडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला. अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहायला लागल्या. मागील काही वर्षांपासून तर हे प्रमाण अधिक वाढले. नागपूर विभागात २० हजारांहून अधिक जागांपैकी ७० ते ८० टक्क्यांहून जागा रिक्त राहायला लागल्या. अशास्थितीत महाविद्यालयांना डोलारा सांभाळणे कठीण झाले होते. दोन्ही महाविद्यालयांतील रिक्त जागांचे प्रमाण प्रचंड वाढले होते.महाविद्यालयांतील खर्च, शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर सुविधा यांच्यावरील खर्च वाढला होता. त्यातुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या फारच अत्यल्प होती. यातूनच महाविद्यालय प्रशासनांनी महाविद्यालये बंद करण्याचाच निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी विभागीय सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांना संपर्क केला असता, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. या दोन्ही महाविद्यालयांकडून ‘बंद’चा अर्ज आला आहे. महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी अगोदर ‘एआयसीटीई’कडे पाठविला होता. तेथून मान्यता मिळाल्यानंतर संबंधित माहिती आता आमच्याकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच पूर्ण प्रक्रिया होईल, असे त्यांनी सांगितले.जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान नाहीही महाविद्यालये बंद होणार असली म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे नाही. मात्र यापुढे नवीन प्रवेश घेतले जाणार नाहीत. जुनी ‘बॅच’ बाहेर पडली की महाविद्यालये कायमस्वरूपी बंद होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.आणखी महाविद्यालये बंद होणार ?विभागातील ६२ महाविद्यालयांमध्ये २१ हजार जागा आहेत. या जागांसाठी केवळ पाच हजारांच्या जवळपास अर्ज आले आहेत. मागील वर्षीदेखील अशीच स्थिती होती. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिले प्राधान्य शासकीय ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालयाला आहे. एकट्या नागपूर शासकीय ‘पॉलिटेक्निक’ची क्षमता हजारहून अधिक आहे. येथे प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी खासगी महाविद्यालयांचा विचार करतात. त्यामुळे इतर महाविद्यालयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेदरम्यानदेखील महाविद्यालयांना निराशाच हाती लागते. त्यामुळेच आणखी महाविद्यालयांकडून बंद करण्याचा प्रस्ताव पाठविल्या जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnagpurनागपूर