दंत महाविद्यालयाला मिळाल्या पीजीच्या दोन जागा
By Admin | Updated: April 11, 2015 02:22 IST2015-04-11T02:22:32+5:302015-04-11T02:22:32+5:30
शासकीय दंत रुग्णालय व महाविद्यालयात बालदंतरोगशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) दोन जागा केंद्रीय

दंत महाविद्यालयाला मिळाल्या पीजीच्या दोन जागा
राज्यात पहिल्यांदाच नागपूरला मान : येत्या सत्रापासून प्रवेश प्रक्रिया
नागपूर : शासकीय दंत रुग्णालय व महाविद्यालयात बालदंतरोगशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) दोन जागा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंजूर केल्या आहेत. तसे पत्रच मंत्रालयाकडून बालदंतरोग शास्त्र विभागप्रमुखांना गुरुवारी प्राप्त झाले. यामुळे येत्या सत्रापासून (२०१५-१६) प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, या दोन जागांमुळे दंतरुग्णांना उत्कृष्ट आरोग्यसेवा तर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच नागपूरला हा मान मिळाल्याचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांनी सांगितले.
पहिले शा. दंत रुग्णालय
राज्यात केवळ मुंबई, औरंगाबादसह नागपुरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आहेत. या तिन्ही रुग्णालयांमध्ये बालदंतरोगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (पीजी) नाही. नाईलाजास्तव शासकीय दंत विद्यार्थ्यांना खासगीतून लाखो रुपये खर्चून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घ्यावे लागायचे. आता पीजीच्या जागाला मंजुरी मिळाल्याने नागपूरचे दंत रुग्णालय महाराष्ट्रातील पहिलेच शासकीय रुग्णालय ठरले आहे.