बंद घरात दोन सख्ख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:27+5:302021-01-08T04:23:27+5:30

कामठी तालुक्यात खळबळ : मृत्यूचे कारण गुलदस्त्यात नागपूर (कामठी) : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दाल ओळी ...

Two numbers in a closed house | बंद घरात दोन सख्ख्या

बंद घरात दोन सख्ख्या

कामठी तालुक्यात खळबळ : मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

नागपूर (कामठी) : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्पना नागोराव लवटे (५०) आणि पद्मा लवटे (६०) अशी या मृत महिलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. प्रकरणाची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही महिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ते शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसल्याचे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाल ओळी नंबर २ येथील लवटे यांच्या घरी कामठी नगरपरिषदेचा कर्मचारी घर कराची डिमांड पावती देण्याकरिता गेला असता घर बंद असल्याने त्याने शेजाऱ्यांना विचारणा केली. शेजाऱ्यांनी दाराच्या आतून पावती खाली टाकण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी पावती टाकण्यासाठी घराच्या आवारात शिरला गेला असता त्याला आतून दुर्गंधीचा वास आला. याबाबत त्याने शेजाऱ्यांना सांगितले. या घटनेची माहिती लगेच जुनी कामठी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. ठाणेदार विजय मालचे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लवटे यांच्या घराचे दार उघडले असता पलंगावर कल्पना लवटे व पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा लवटे या दोघीही मृतावस्थेत दिसून आल्या. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे कामठी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

त्या दोघी उच्चशिक्षित

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मा व कल्पना या दोन्ही उच्चशिक्षित असून त्या अविवाहित होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोघी मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करायच्या. परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी शेजारी व इतर कोणत्याही नातेवाईकांकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा शेजाऱ्यांशीही फारसा संबंध नव्हता.

Web Title: Two numbers in a closed house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.