ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोघे ठार; ११ जखमी

By Admin | Updated: April 21, 2016 03:11 IST2016-04-21T03:11:40+5:302016-04-21T03:11:40+5:30

कुवारा भिवसेन येथे यात्रेकरिता भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले.

Two killed in tractor trolley; 11 injured | ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोघे ठार; ११ जखमी

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोघे ठार; ११ जखमी

पारशिवनी : कुवारा भिवसेन येथे यात्रेकरिता भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. अपघाताची ही घटना शीलादेवी-सुवरधरा रस्त्यावर बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.भारत गणपत वरखडे (५५, रा. बनेरा) व राजेश बलदेव आहाके (१४, रा. शीलादेवी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातातील जखमींमध्ये रंजना पंधराम (१८, रा. अंबाझरी), सुरतीया इनवाते (६०, रा. पारडी), आशा भन्नारे (१६, रा. पारडी), सोनीलाल मरकाम (२१, रा. शीलादेवी), मन्सूक मरस्कोल्हे (५५, रा. उमरानाला), ऐश्वर्या धुर्वे (७, रा. उमरानाला), लीलावती भन्नारे (४७, रा. पारडी), लीलाबाई टेकाम (४०), रामेश्वर धुर्वे (२२), सूरज धुर्वे (१२), संजू आहाके (१७) सर्व रा. शीलादेवी, या ११ जणांचा समावेश आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर सहा जणांवर पारशिवनी ग्रामीण रुग्णलयात औषधोपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
सविस्तर असे की, शीलादेवी येथील रवी सुखदेव उईके यांच्याकडील कुवारा भिवसेन येथे नवसाचा कार्यक्रम होता. यानिमित्त उईके कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसह एमएच-४०/एल-४५४९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कुवारा भिवसेन येथे जात होते. दरम्यान, शीलादेवी ते सुवरधरा मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. ट्रॉली उलटल्याने ट्रॉलीतील सर्वजण दबल्या गेले. यात भारत वरखडे व राजेश आहाके या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य ११ जण जखमी झाले. सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये १९ नागरिक बसले होते.

यात्रेदरम्यान पहिलीच घटना
चैत्र पंचमीनिमित्त कुवारा भिवसेन येथे दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त अनेकजण येथे दाखल होतात. शीलादेवी येथील उईके कुटुंबीयांनी यात्रेनिमित्त घरगुती नवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र वाटेतच अपघातात दोघांचा मृत्यू ओढवल्याने शीलादेवी गावात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी ग्रामपंचायतींना जोडल्या जाणाऱ्या केबल लाईनचे जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते. त्या मशीनची बकेट ट्रॉलीला लागल्याने हा अपघात झाला असावा. शिवाय, ट्रॅक्टरचालक हा दारू पिऊन होता, अशी चर्चा घटनास्थळावरील नागरिकांत दिसून आली.

Web Title: Two killed in tractor trolley; 11 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.