भीषण अपघातात दाेघे ठार, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:53+5:302021-05-25T04:08:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : सुसाट कारने आधी माेटरसायकल व नंतर ॲक्टिव्हाला मागून जाेरात धडक दिली. त्यात दाेघांचा मृत्यू ...

भीषण अपघातात दाेघे ठार, तिघे जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : सुसाट कारने आधी माेटरसायकल व नंतर ॲक्टिव्हाला मागून जाेरात धडक दिली. त्यात दाेघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी)-खापरखेडा मार्गावर रविवारी (दि. २३) मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश उपेंद्र चौधरी (२४, रा. जयभाेलेनगर, चनकापूर, ता. सावनेर) व हर्षल रविशंकर बनोदे (२४, रा. चनकापूर, ता. सावनेर), अशी मृतांची तर नीतेश शालिकराम पंचेश्वर (२४), प्रतीक राजेंद्र बनोद (२४) दाेघेही रा. चनकापूर, ता. सावनेर व वृषभ मनोहर माटे (२४, रा. खापरखेडा, ता. सावनेर), अशी जखमींची नावे आहेत. सुरेश, हर्षल, नीतेश, प्रतीक व वृषभ हे मित्र असून, ते एमच-४०/एझेड-१०५५ क्रमांकाची ॲक्टिव्हा आणि एमएच-४०/बीव्ही-०४०९ क्रमांकाच्या माेटरसायकलने दहेगाव(रंगारी)हून चनकापूर येथे घराकडे जात हाेते.
ते या मार्गावरील एका लाॅनसमाेर येताच मागून सुसाट आलेल्या एमएच-३१/डीसी-८८२७ क्रमांकाच्या कारने त्या दाेन्ही वाहनांना जाेरात धडक दिली. यात दाेन्ही वाहनांवरील पाचही जण गंभीर जखमी झाल्याने, त्यांना लगेच नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे सुरेश व हर्षलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, उर्वरित तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक तर दाेघांची स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी नीतेश मुरलीधर वर्मा (२४, रात्र चनकापूर, ता. सावनेर) याच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक मेश्राम व गाेंविदा दहीफडे करीत आहेत.
....
कारचालक दारूच्या नशेत
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचा चालक संकेत अशोक ढोक (२४, रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर) हा दारू प्यायलेला हाेता, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. या कारने आधी माेटरसायकलला धडक दिली, त्यानंतर ॲक्टिव्हाला धडक देत काही दूर फरफटत नेले. त्यानंतर कार व ॲक्टिव्हा राेडच्या कडेला आदळली. मृत तरुण एकाच गावातील रहिवासी असल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे. कारचालक संकेत ढाेक यास अअक केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी दिली.