पाचपावलीत दोन गटांत सशस्त्र हाणामारी, दोन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 09:04 PM2018-01-21T21:04:31+5:302018-01-21T21:04:42+5:30

दोन गटांत निर्माण झालेल्या वादानंतर दोन्हीकडून एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. त्यातील दोघांची अवस्था गंभीर आहे.

Two groups of armed robbery, two seriously injured | पाचपावलीत दोन गटांत सशस्त्र हाणामारी, दोन गंभीर जखमी

पाचपावलीत दोन गटांत सशस्त्र हाणामारी, दोन गंभीर जखमी

Next

नागपूर : दोन गटांत निर्माण झालेल्या वादानंतर दोन्हीकडून एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. त्यातील दोघांची अवस्था गंभीर आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली.
बाबा बुद्धाजी नगरातील रहिवासी बिपीनदिपसिंग निर्मलसिंग जस्सल (२७) आणि देवीनगरातील रहिवासी कोमलदीपसिंग सुलतानसिंग संधू (२२) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन खरेदीच्या व्यवहारातून वाद सुरू आहे. त्यावरून कोमलने फोन करून जस्सलला एका रेडिमेड कपड्याच्या दुकानासमोर शनिवारी रात्री ११.३० ला बोलविले.

यावेळी दोघांचे नातेवाईकही समोरासमोर आले. त्यांच्यात वाद सुरू होताच त्यांनी कृपाण (कट्यार) तसेच दगडाने एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. कोमल संधू, चंचल संधू , जगदीप संधू आणि त्याच्या भावाने बिपिनदीपसिंगच्या डोक्यावर तसेच पोटावर किरपानचे घाव घातले. तर कवी जस्सल, त्याचा भाऊ, वडील आणि आईने कोमलदीपसिंगवर किरपानने हल्ला चढवून त्याला खाली पाडले आणि त्याचे डोके दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. या सशस्त्र हाणामारीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. शेजा-यांनी धाव घेऊन त्यांना एकमेकांपासून दूर केले. त्यानंतर दोन्ही गटाकडून पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. राखुंडे यांनी दोन्ही गटांतील उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पुण्याचे पोलीस नागपुरात
संधू गटातील आरोपी आॅटो डील करतात तर गटातील एका आरोपीवर पुणे (ग्रामीण) ग्रामीणमध्ये ट्रक चोरीचा गुन्हा दाखल आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस नागपुरात आरोपीच्या शोधासाठी आले होते. हे कळाल्याने शेजा-यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. आपली बदनामी विरोधी गटातील मंडळी करीत असल्याचा संशय आल्याने वाद वाढला अन् नंतर सशस्त्र हाणामारीची घटना घडली.

Web Title: Two groups of armed robbery, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.