स्वाईन फ्लूने दोन महिलांचा बळी

By Admin | Updated: November 3, 2015 03:17 IST2015-11-03T03:17:51+5:302015-11-03T03:17:51+5:30

उपराजधानीत थंडी वाढताच स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. नोव्हेंबर महिना

Two female victims of swine flu | स्वाईन फ्लूने दोन महिलांचा बळी

स्वाईन फ्लूने दोन महिलांचा बळी

नागपूर : उपराजधानीत थंडी वाढताच स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. नोव्हेंबर महिना उजाडत नाही तोच मेडिकलमध्ये दोन महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत ७१ रुग्णांचे बळी गेले आहेत.
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या २७ वर्षीय तरुणी व ६० वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या दोन्ही महिला नागपुरातील रहिवासी आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आॅक्टोबर महिन्यामध्ये नागपूर विभागात २८ रुग्णांचा मृत्यू तर १०३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत मृत्यूची संख्या नागपूर विभागात १६५ झाली असून, ७५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ५४३ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two female victims of swine flu