मेडिकलमध्ये दोन डॉक्टरांत जुंपली
By Admin | Updated: February 8, 2015 01:14 IST2015-02-08T01:14:21+5:302015-02-08T01:14:21+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात शनिवारी दोन डॉक्टरांमध्ये चांगलीच जुंपली. या प्रकरणामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मेडिकलमध्ये दोन डॉक्टरांत जुंपली
रुग्णाला भरती करण्याऐवजी दिली सुटी : डॉक्टरांमध्ये ‘सिनीअर’ व ‘ज्युनिअर’चा वाद
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात शनिवारी दोन डॉक्टरांमध्ये चांगलीच जुंपली. या प्रकरणामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामाला घेऊन निवासी डॉक्टरांमध्ये ‘सिनीअर’ व ‘ज्युनिअर’ हा वाद नेहमीच उफाळून येत असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टराने रुग्णाची तपासणी करून त्याला भरती करून घेण्याचा निरोप अटेडंटकडून कनिष्ठ डॉक्टराला दिला. परंतु अटेंडटने वरिष्ठ डॉक्टरांची नेमकी सूचना कनिष्ठ डॉक्टरला दिली नाही. परिणामी कनिष्ठ डॉक्टरने त्या रुग्णाला सुटी देऊन टाकली. कनिष्ठ डॉक्टर बाह्यरुग्ण विभागात आले असता वरिष्ठ डॉक्टरने रुग्णाबाबत विचारले असता सुटी दिल्याचे सांगताच, त्याला फैलावर घेतले. परिणामी, दोन्ही डॉक्टरांमध्ये बाह्यरुग्ण विभागात चांगलीच जुंपली.
एकमेकांना हातवारे करून दोन्ही डॉक्टरांमध्ये प्रचंड वाद झाला. डॉक्टरच भांडत असल्याचे पाहून उपस्थितांची गर्दी वाढली. वाद विकोपाला जात असताना सहकारी डॉक्टर्सनी धाव घेऊन दोघांचेही भांडण सोडविले. इकडे रुग्णांकडे मात्र दुर्लक्ष झाले. ‘सिनीअर्स’से बात करना नही आता क्या’, असे वरिष्ठ डॉक्टरने ज्यु. डॉक्टरला धमकावल्याचेही सूत्रांनी सांगितले. दोन्ही डॉक्टरांमधील हा वाद उपस्थितांमध्ये मात्र चर्चेचा विषय ठरला. (प्रतिनिधी)