कळमना आणि वाठोड्यातील अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:15 IST2021-09-02T04:15:58+5:302021-09-02T04:15:58+5:30

डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंग मार्गावर पायी जात असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला यूपी ७० - जीटी ०२८४ क्रमांकाच्या आरोपी ट्रकचालकाने ...

Two died along with a woman in an accident at Kalmana and Vathoda | कळमना आणि वाठोड्यातील अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

कळमना आणि वाठोड्यातील अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंग मार्गावर पायी जात असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला यूपी ७० - जीटी ०२८४ क्रमांकाच्या आरोपी ट्रकचालकाने जोरदार धडक मारली. यात तो व्यक्ती ठार झाला. सोमवारी रात्री ९.४५ वाजता हा अपघात घडला. कळमना पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अशाच प्रकारे सीताबाई रामाजी ठाकरे (वय ५५, रा. पुयार चारबट्टी, जि. भंडारा) या सोमवारी रात्री ७.३० वाजता पांढुरणा (वाठोडा) येथे रस्त्याच्या कडेला बसून असताना दुचाकीचालकाने त्यांना जोरदार धडक मारली. गंभीर जखमी झालेल्या सीताबाईंना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांना मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोनू विकास राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी दुचाकीचालक अजय कोठीराम देवगडे याची चाैकशी सुरू आहे.

--------

Web Title: Two died along with a woman in an accident at Kalmana and Vathoda