लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू होती. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच महापौर संदीप जोशी यांनी पाऊल उचलले आहे. २५ व २६ जुलै रोजी नागपुरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यादरम्यान मनपाच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, दुकाने बंद राहणार आहेत. सकाळी दूध वितरण करण्यात येईल, शिवाय वर्तमानपत्रेदेखील सुरू राहणार आहेत.
जनता कर्फ्यूच्या घोषणेनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी .पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.वस्त्यांमधील किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी.आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा.धान्य, खाद्यतेल, किराणा खरेदीवर ग्राहकांचा भर.भाजीपाला बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.इतवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीमुळे ट्रॉफिक जाम.मद्य दुकाने बंद होणार असल्याने दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या रांगा.नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर डेअरीमध्ये दूध आणि दही खरेदीसाठी गर्दी.महाल चौकात गर्दी न करण्याचे मनपातर्फे जनता कर्फ्यूवर मार्गदर्शन.लॉकडाऊनच्या भीतीने लोकांची आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी.