लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार १ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. यानिमित्ताने विविध धामिंक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त ६९ मीटर लांबीचा पंचशील ध्वजासह शांती मार्च निघेल. दुपारी १२.५० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या जीवन प्रवास मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. यावेळी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकरे उपस्थित असतील. सायंकाळी ७ वाजता बुध्द व भीम गीतांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
गुरूवार २ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता पुज्य भिक्षूसंघाच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुध्द वंदना होईल. सकाळी १०.३० वाजता परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पास समता सैनिक दलातफें मानवंदना दिली जाईल. दुपारी १२ वाजता भारतीय संविधानाच्या जगातील सर्वात मोठ्या आकाराची प्रतिकृती निमिंती संकल्पाचे प्रसारण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थीत राहतील. दुपारी १ वाजता आठवले यांच्या हस्ते त्यांच्या खासदार निधीतून ओगावा सोसायटीला प्राप्त झालेल्या ग्रीन एसी बसचे लोकार्पण होईल. ड्रॅगन पॅलेस परिसरात येत्या वर्षभरात ३०० लोकांची स्थायी निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही ॲड. कुंभारे यांनी यावेळी दिली.
दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेससाठी डीपीसीत तरतूद असावी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त पवित्र दीक्षाभूमी व कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेंपलला लाखो अनुयायी येतात. त्यासाठी या दोन्ही ठिकाळी प्रशासनाला मोठी व्यवस्था करावी लागते. सोयीसुविधा उभाराव्या लागतात. त्यामुळे सरकारने डीपीसीत या कार्यक्रमासाठी विशेष आथिंक तरतूद करावी, अशी मागणी ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केली.
Web Summary : Dragon Palace Temple in Kamthi will host a two-day Dhammachakra festival starting October 1st. The event includes a peace march, photo exhibition, cultural programs, Buddha Vandana, and the unveiling of a large Constitution replica. Financial provisions for Dikshabhoomi and Dragon Palace were requested.
Web Summary : कामठी के ड्रैगन पैलेस मंदिर में 1 अक्टूबर से दो दिवसीय धम्मचक्र महोत्सव आयोजित किया जाएगा। कार्यक्रम में शांति मार्च, फोटो प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, बुद्ध वंदना और संविधान की प्रतिकृति का अनावरण शामिल हैं। दीक्षाभूमि और ड्रैगन पैलेस के लिए वित्तीय प्रावधानों का अनुरोध किया गया।