शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नागपुरात एका बेडवर दोन कोरोना रुग्ण; प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 09:09 IST

Nagpur news Coronavirus Cases उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह रुग्णांची भटकंती खासगी व शासकीय रुग्णालयात बेडसाठी वेटिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.गेल्या वर्षी आॅक्टोबरनंतर काही महिने संक्रमण कमी झाले होते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील दहा दिवसांपासून शहरात दर दिवसाला २५०० ते ३००० हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. २५ मार्चपर्यंत शहरात १ लाख ६७ हजार ५०० रुग्ण पॉझिटिव्ह झाले. होम आयासोलेशनमधील रुग्णांची संख्या २४ हजारांवर गेली आहे. महापालिका प्रशासन उपाययोजना करीत आहे; परंतु वाढत्या रुग्णांच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. गंभीर रुग्णांना भरती होण्यासाठी भटकंती करावी लागते. रुग्णालयात वेळीच बेड मिळत नाही. वेटिंगवर राहावे लागते. या संदर्भात प्रशासनाला धारेवर धरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुरुवारी नगरसेवकांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत केली.शहरातील कोरोना संक्रमणाचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला. शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात उपलब्ध बेड, लसीकरण व आरटीपीसीआर चाचण्यांसंदर्भात वस्तुस्थिती मांडण्याची मागणी केली. प्रफुल्ल गुडधे म्हणाले, बाधित रुग्णांना भरती व्हायचे असेल तर यंत्रणा सक्षम नाही. वेळीच बेड उपलब्ध होत नाही. मागणीनुसार आॅक्सिजनचा पुरवठा केला जात नाही. मनपा रुग्णालयात औषध मिळत नाही. यावर प्रशासनाने तात्काळ उपायोजना करण्याची मागणी त्यांनी केली.मेयो, मेडिकलमध्ये गंभीर रुग्णांना वेळीच बेड मिळत नाही. वेटिंगवर राहावे लागत असल्याचे आभा पांडे यांनी निदर्शनास आणले. नंदा जिचकार यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी जनजागृती करण्याची सूचना केली. दिव्या धुरडे यांनी मेयो, मेडिकलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणले. नितीन साठवणे यांनी खासगी रुग्णालयांकडून वारेमाप बिल काढले जात असून यावर मनपाचे नियंत्रण नसल्याचा आरोप केला. सुनील हिरणवार, जितेंद्र घोडेस्वार यांनीही कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस