शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:47 IST

जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उतारा शिवारातील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी ही दुर्देवी घटना घडली.

ठळक मुद्देउतारा शिवारातील घटना: गावात पसरली शोककळा

लोकमत  न्यूज  नेटवर्क

जलालखेडा (नागपूर) : जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उतारा शिवारातील  शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी ही दुर्देवी घटना घडली. सुजत ऊर्फ मोनु जगदीश घाटवाडे (१२) व भोजराज लक्ष्मण चचाने (१५) दोघेही रा. अंबाडा(सा.) अशी मृत मुलांची नावे आहेत.मंगळवारी हे दोघे घरच्यांना न सांगता उतारा शिवारातील जंगलात असलेल्या शेततळ्यात पोहायला गेले होते. या दोन्ही मुलांचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. आई- वडील बाहेरून परत आल्यावर दोन्ही मुलांच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना शेत तळ्याच्या बाजूला या मुलांचे कपडे दिसले. त्यांनी ही माहिती मुलांच्या घरच्यांना सांगितली. यानंतर शेततळ्याची पाहणी केली असता एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला तर दुसरा आत बुडालेला होता. या घटनेची माहिती जलालखेडा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील शवविच्छेदन गृहात पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून. बुधवारी त्या दोन्ही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या लहान मुलांच्या  मृत्यूमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. सुजतला एक भाऊ आहे तर भोजराज हा आई-वडीलांना एकटा मुलगा होता. या घटनेचा तपास ठाणेदार दीपक डेकाटे, उपनिरीक्ष राजेंद्र सोनवाने, बिट जमादार मोरेश्वर चलपे, पोलीस कर्मचारी दिनेश हिवसे करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर