शेजारची दोन मुले, दोन मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:08 IST2021-03-27T04:08:31+5:302021-03-27T04:08:31+5:30

मानकापुरात खळबळ : उलटसुलट चर्चेला उधाण नागपूर : माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी दोन मुले आणि दोन मुली गुरुवारी ...

Two boys next door, two girls missing | शेजारची दोन मुले, दोन मुली बेपत्ता

शेजारची दोन मुले, दोन मुली बेपत्ता

मानकापुरात खळबळ : उलटसुलट चर्चेला उधाण

नागपूर : माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी दोन मुले आणि दोन मुली गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. ते संगनमत करून पळून गेले की त्यांना कोणी फूस लावून पळवून नेले, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

चौघांचेही वय ११ ते १६ वर्षे वयोगटात असल्याने पोलिसांची विविध पथके त्यांना शोधण्यासाठी कामी लागली आहेत. विशेष म्हणजे, पळून जाणाऱ्यांत १६ वर्षीय मुलगा आणि त्याची अकरा वर्षीय भाची, तर शेजारचा १५ वर्षीय मुलगा आणि त्याची १४ वर्षांची बहीण यांचा समावेश आहे.

गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ते चौघे जण घरच्या दुचाक्या घेऊन पळून गेले. रात्र झाली तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. नंतर मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी त्या चौघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके भंडारा-गोंदियाकडे रवाना केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

---

Web Title: Two boys next door, two girls missing