Two bombs found in Nagpur airport terminal building! | नागपूर एअरपोर्ट टर्मिनल बिल्डींगमध्ये मिळाले दोन बॉम्ब!
नागपूर एअरपोर्ट टर्मिनल बिल्डींगमध्ये मिळाले दोन बॉम्ब!

ठळक मुद्देमॉकड्रीलदरम्यान प्रवाशांना काढले बाहेर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची सूचना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांनी टर्मिनल बिल्डींग खाली केली. किमान दोन तास बॉम्बचा शोध घेतल्यानंतर दोन बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले. सुरक्षा दलाची ही सर्व कसरत मॉकड्रीलची होती.
या अभ्यासादरम्यान इंडिगो एअरलाईन्समधून एक फोन कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी स्वत:ला जम्मू काश्मीर येथील सांगून कलम ३७० हटविल्यामुळे व जनतेला कैदेत ठेवल्याबद्दल रोष व्यक्त करीत टर्मिनल बिल्डींगच्या येणाऱ्या आणि जाणाºया गेटजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. घटनेची सूचना मिळताच बैठक बोलावण्यात आली. यात कार्यवाहीची दिशा ठरविण्याबरोबरच संबंधित एजन्सीला सूचनाही करण्यात आली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळावर ही मॉकड्रील करण्यात आली. पोलिसांचे वाहन पोहचले. अ‍ॅम्ब्युलन्सचे सायरन विमानतळावर वाजायला लागले. व्यवस्थापनाने सूचना देत प्रवाशांना बाहेर काढले. बॉम्बची सूचना मिळताच तीन प्रवासी (बनावट) बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. एअरलाईन्स, मिहान इंडिया लि. सह अन्य एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व पोलिसांचे डॉग स्क्वॉड व बॉम्ब शोधक नाशक पथकाद्वारे बॉम्बचा तपास सुरू केला. दरम्यान दोन क्विक रिस्पॉन्स टीम, अग्निशमन विभागाचे फायर टेंडर सुद्धा उपस्थित झाले. ही मॉकड्रील विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सरडकर, सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट विन्सेंट यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यावेळी एअरपोर्ट डायरेक्टर विजय मुळेकर तसेच अन्य एजन्सीचे अधिकारी उपस्थित होते. किमान दीड तास मॉकड्रील चालल्यानंतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी समीक्षा बैठक घेऊन त्रुटींवर चर्चाही केली.

Web Title: Two bombs found in Nagpur airport terminal building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.