शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून गोल्ड तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 9 किलो सोनं जप्त

By नरेश डोंगरे | Updated: October 14, 2023 14:53 IST

या कारवाईमुळे सोन्याची तस्करी करणाऱ्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

नरेश डोंगरे 

नागपूर : रेल्वे गाड्यांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना आरपीएफने जेरबंद केले आणि त्यांच्याकडून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे नऊ किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली. नागपूर रेल्वे स्थानकावर ही धाडसी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सोन्याची तस्करी करणाऱ्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, १२ ऑक्टोबरला पुण्याकडे निघण्याच्या तयारीत असलेल्या ट्रेन नंबर १२१३० हावडा - पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती एका खबऱ्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार आर पी एफ च्या पथकाने एस फोर कोच मधील २४ आणि २८ क्रमांकाच्या सीटवर बसलेल्या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. राहुल आणि बालूराम नामक या दोघांकडे असलेल्या पिटू (बॅग)ची तपासणी केली असता त्यात सुमारे साडेआठ ते नऊ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे आढळली. या मौल्यवान बिस्किटांबाबत आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढच्या कारवाईसाठी त्यांना डीआरआय कार्यालयात नेण्यात आले.प्राथमिक चौकशीतच हे दोघे सोन्याची स्मगलिंग करत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांच्या जवळची सुमारे साडेपाच कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. 

या सोन्याच्या तस्करीत अनेक जण सहभागी असल्याचा संशय असल्यामुळे आर पी एफ, सीआयबी तसेच डी आर आय च्या वरिष्ठांनी सुमारे दोन दिवस ही कारवाई गुप्त ठेवून सोने तस्करीचे नेटवर्क शोधण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, पत्रकारांना या कारवाईची कुनकूण लागल्यानंतर ही कारवाई आज उघड करण्यात आली. आरपीएफ चे निरीक्षक मीना,  हेडकॉन्स्टेबल मदन लाल, कॉन्स्टेबल मोहन लाल दिवांगन, अमोल चहाजगुणे, सचिन सिरसाट,  उपनिरीक्षक (एएसआय) मुकेश राठोड, जसवीर सिंग,  सीआयबी/नागपूरच्या लेडी कॉन्स्टेबल सिरीन यांनी ही कामगिरी बजावली. पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनं