१२३२ लिटर देशी दारूसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:07 IST2021-03-25T04:07:52+5:302021-03-25T04:07:52+5:30

नागपूर : राज्य अबकारी विभागातर्फे कुही पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एका मारुती ८००(एमएच-३१-झेड-९२९३)मधून १,२३२ लिटर देशी दारू ...

Two arrested with 1232 liters of liquor | १२३२ लिटर देशी दारूसह दोघांना अटक

१२३२ लिटर देशी दारूसह दोघांना अटक

नागपूर : राज्य अबकारी विभागातर्फे कुही पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एका मारुती ८००(एमएच-३१-झेड-९२९३)मधून १,२३२ लिटर देशी दारू जप्त करण्यात आली. यात दोघांना अटकही केली गेली. ही कारवाई सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान सालई ते चिकना मार्गदरम्यान करण्यात आली.

कारवाईदरम्यान वाहन चालक रज्जाक सरदार अली याला अटक करण्यात आली. त्याला विचारपूस केली असता ही दारू व वाहन शांतिनगर नागपूर येथील मोहम्मद असगर मोहम्मद अकबर यांचे असल्याचे सांगितले. मो. असगरला मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याने दारू व वाहन त्याचे असल्याचे कबूल केले. यानंतर असगरलाही अटक करण्यात आली. दोघांनाही कुही येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Two arrested with 1232 liters of liquor