अडीच वर्षांचे मौनव्रत!

By Admin | Updated: August 12, 2014 01:08 IST2014-08-12T01:08:12+5:302014-08-12T01:08:12+5:30

जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावाव्या, किमान त्यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी लोकांची माफक अपेक्षा असते. परंतु सदस्यच मौनव्रत धारण करीत असेल तर अपेक्षा कुणाकडून

Two-and-a-half-year monsoon! | अडीच वर्षांचे मौनव्रत!

अडीच वर्षांचे मौनव्रत!

जिल्हा परिषद : सभागृहात एकदाही प्रश्न मांडला नाही
गणेश हूड - नागपूर
जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावाव्या, किमान त्यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी लोकांची माफक अपेक्षा असते. परंतु सदस्यच मौनव्रत धारण करीत असेल तर अपेक्षा कुणाकडून करणार. १२ सदस्य अडीच वर्षापासून गप्प आहेत. या कालावधीत झालेल्या ११ सभात त्यांनी एकही प्रश्न मांडला नाही. एवढेच नव्हेतर त्यांनी चर्चेतही सहभाग घेतलेला नाही.
जि.प.सदस्यांना आपल्या भागातील समस्या, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता यावे, या हेतूने दर तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. एखाद्या तातडीच्या विषयावर वा सदस्यांनी मागणी केल्यास विशेष सभा बोलावली जाते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी पुढील महिन्यात २० सप्टेंबरला संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील ही अखेरची सर्वसाधारण सभा आहे. गेल्या अडीच वर्षात ११ सभा झाल्या. जि.प.च्या ५९ सदस्यांपैकी १२ सदस्यानी सभागृहात एकदाही प्रश्न उपस्थित केला आहे. अखेरच्या सभेत तरी ते मौनव्रत सोडतील का असा प्रश्न लोकांना पडला आहे. गोपाल खंडाते, आशा खराडे, रामदास मरकाम, शांताराम मडावी, अंजिरा उईके, दीपक गेडाम, माया कुसुंबे, पुष्पा वाघाडे, शालू हटवार, दीपाली इंगोले आदींचा मौनव्रतीत समावेश आहे. काही सदस्य अडीच वर्षात एकदाच बोलले. १० सभात त्यांनीही मौनव्रत पाळले. विशेष म्हणजे यात भावी अध्यक्षांच्या शर्यतीत असलेल्या सदस्यांचाही समावेश आहे. मतदारांना विकासाची अपेक्षा असलेल्या प्रणिता कडू, अरुणा मानकर आदींनी एकदाच प्रश्न मांडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मार्च २०१२ ला सूत्रे स्वीकारली
४३० मार्चच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर ३१ मार्च २०१२ ला विद्यमान अध्यक्ष संध्या गोतमारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी पदाची सूत्रे स्वीकारली होती. प्रथमच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व गोंडवाना गणतंत्र पाटी एकत्र आले होते. अध्यक्षांसह सभापतींचा कार्यकाळ २० सप्टेंबर २०१४ ला संपत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील ही शेवटचीच सभा आहे. पुन्हा चमत्कार होण्याची शक्यता आहे.

Web Title: Two-and-a-half-year monsoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.