एमडी विकणाऱ्या दोन आरोपींना केले गजाआड
By दयानंद पाईकराव | Updated: May 23, 2024 16:26 IST2024-05-23T16:20:37+5:302024-05-23T16:26:35+5:30
१.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

Two accused who were selling MD arrested
नागपूर : एमडी पावडर विकणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड करून त्यांच्या ताब्यातून १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुकेश उर्फ नन्हे विवेक सनकाळे (३४, रा. जुना बगडगंज, कुंभार टोली, नंदनवन) आणि अक्षय गजानन येवले (२९, रा. गणपतीनगर, गुमथाळा कॉलनी, मौदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना एका दुचाकीवर स्वार असलेल्या दोघांवर संशय आला. दोघांना थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ ११.८३ ग्रॅम एमडी पावडर किंमत १ लाख १८ हजार ३०० रुपये, दोन मोबाईल आणि दुचाकी असा एकुण १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २२ (ब), २९ एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.