शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

नागपुरात ट्वेंटी-ट्वेंटीचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:28 IST

अखेर घड्याळाने १२ चा गजर केला... अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी आसमंत उजळून टाकणाऱ्याफटाक्याच्या आतषबाजीत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गारठवणाऱ्या थंडीने पारा तासागणिक खाली येत असताना तरुणाईच्या उत्साहाचा आलेख मात्र वेगाने वर जात होता... तरुणाई नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अधीर झाली होती. पार्टीचा प्लॅन कुठे, अशा चर्चा करीत हॉटेल, ढाबे बुक झाले. कौटुंबिक सेलिबे्रशनच चांगले असे मानणाऱ्यांनी घराच्या टेरेसवरच डीजे लावून पार्टीची व्यवस्था चालविली होती. अशात सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली आणि या उत्साहावर विरजण पडते की काय, असे वाटायला लागले होते. पण उत्साह कमी पडू देतील ते नागपूरकर कसले? टेरेसवरची पार्टी घरात आली पण उत्साह तोच होता. दरम्यान पावसाने थोडी उसंत दिली आणि अधीर झालेल्या तरुणाईचे जत्थे भारी परफ्युम मारून फुटाळा चौपाटीवर रात्री ८ पासून पोहोचायला लागले होते... हळूहळू माहोल बनायला लागला होता. इकडे धरमपेठ, रविनगर, सदर परिसरातही अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता... नाही नाही करीत झिंग चढत गेली.. अखेर घड्याळाने १२ चा गजर केला... अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी आसमंत उजळून टाकणाऱ्याफटाक्याच्या आतषबाजीत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली. 

येणारा प्रत्येक दिवस हा कमीअधिक प्रमाणात सारखाच वाटत असला तरी काही ना काही बदल घडून येतच असतो. घड्याळाचा वेगात फिरणारा सेकंद काटा अन् संथ फिरणारा तास काटा त्यांच्या वेळेचा बदल दाखवितो. भिंतीवर टांगलेले कॅलेंडर एक एक दिवस मोजत महिन्याला पान बदलण्याचा संदेश देते आणि एक दिवस स्वत:च निरोप घेण्याची आज्ञा मागते. या सर्व बदलाचे संकेत देणाऱ्या घडामोडीच तर आहेत कारण परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. दिवस सारखाच वाटत असला तरी परिवर्तनाचे असंख्य पुंजके त्यात सामावले असतात. उत्क्रांतीच्या अवशेषात गुहेतून निघाल्यापासून मोबाईल धरून माहिती तंत्रज्ञानाने जगाची मुशाफिरी करण्यापर्यंतचे माणसाचे परिवर्तन आपण अनुभवतोच की. असाच बदल दर्शविणारा आणि २०१९ च्या जागी २०२० असे परिवर्तन करायला सांगणारा हा क्षण. नव्या आशा घेउन प्रकाशाच्या नव्या दिशा शोधण्याचा संदेश हा क्षण देत आहे आणि आपण सर्व या क्षणाचे साक्षीदार ठरलो आहोत.फुटाळ्यावर सेलिब्रेशन मूडसेलिब्रेशनचा कोणताही उत्सव असो, फुटाळा तलाव चौपाटी कायम उत्साहाच्या मोडमध्ये असतो. अशात थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्सव म्हटल्यावर सांगायलाच नको. नेहमीप्रमाणे फुटाळा सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होता आणि ट्वेंटी-ट्वेंटीचे तेवढेच ग्रँड स्वागत चौपाटीवर झाले. दरवर्षीप्रमाणे चौपाटीवर आमदार प्रकाश गजभिये यांनी पोलीस-नागरिक सहकार्यातून नववर्षाच्या स्वागताची संगीतमय व्यवस्था केली होती आणि या आर्केस्ट्रा व डीजेचा तरुणाईने भरभरून आनंद घेतला. १२ चा ठोका पडला अन् सर्वांनीच जल्लोष करीत एकमेकांना चिअर्स करीत मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या २०२० या वर्षाचे दणक्यात स्वागत केले. फुटाळा तरुणाईने ओसंडून गेला होता. डीजेची वेळ संपली होती, पण फुटाळा तलावावर जमलेल्या युवक-युवतींनी १२ वाजल्याबरोबर स्वत:च एकत्रितपणे २०१९ ची लोकप्रिय गाणी गात ठेका धरला. जोश, उत्साह आणि तरुणाईच्या जल्लोषाने आसमंत फुलले होते.वाहनांना बंदी, बाईकस्वारांची हुल्लडबाजी रोखलीदरवर्षी फुटाळा तलावावर थर्टी फर्स्टचा आनंद काही औरच असतो. तरुण-तरुणींसह अनेक लोक कुटुंबासह चौपाटीवर नववर्षाच्या स्वागतासाठी येत असतात. मात्र यादरम्यान आपले वाहन घेऊन हॉर्नचा मोठमोठा आवाज करीत सुसाट पळणारे बाईकस्वार आनंदात मीठाचा खडा टाकत असतात. या हुल्लडबाजीला नियंत्रित करण्यासाठी यावर्षी पोलिसांनी फुटाळा चौपाटी परिसरात वाहनांना बंदी घातली. विसर्जन स्थळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बाईक्सवर धिंगाणा करणाऱ्या तरुणांवर नियंत्रण आले.तरुणींचेही जोरदार सेलिब्रेशनफुटाळा चौपाटीवर आयोजित ऑर्केस्ट्रा व डीजेवर रात्री ८.३० वाजतापासून ते रात्री १२ पर्यंत तरुणाई थिरकली. यात तरुणांसोबतच तरुणींचाही मोठा सहभाग होता. आपल्या कुटुंबासह अनेक लोक येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एकत्रित आले. नागपुरात जवळपास हजार लोक नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्रित झाल्याचे फुटाळा तलाव हे एकमेव सार्वजनिक ठिकाण होते. ऑर्केस्ट्राच्या गीतावर तुफान ताल धरीत युवक-युवतींनी येथे नृत्याचा धमाल आनंद घेतला. यात युवतींचाही लक्षणीय सहभाग होता. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गोवारी उड्डाण पूल आणि सक्करदरा उड्डाण पूल बंद ठेवण्यात आला होता.बार-पब फुल्ल, रस्त्यावर नियंत्रित गर्दीएरवी प्रत्येक ३१ डिसेंबर म्हणजे नागपूरचे रस्ते तरुणाईने ओसंडून वाहत असतात. मावळत्या वर्षाला निरोप देताना एरवी उत्साहाला उधाण येते. तरुणाईच्या थिरकणाऱ्या पावलांनी उन्मादाचे वातावरण निर्माण होते. पण यंदा म्हणावा तसा उन्माद नव्हता. ‘सेलिब्रेशन अ‍ॅण्ड चिअर्स’ होते, पण सारेच हॉटेल्स, पब आणि बारमध्ये किंवा घरामध्ये. रस्त्यावर चालणारा धिंगाणा नव्हता, सुसाट वेगाने गाड्या पळवणारे युवक नव्हते अन् त्यांच्या सेलिब्रेशनचा आरडाओरडाही नव्हता.सेलिब्रिटी शोचे तरुणांना आकर्षणनवीन वर्षाच्या सेलिब्रेशनाचे औचित्य साधून तरुणांना आकर्षित करण्यासाठी शहरातील हॉटेल्समध्ये स्पेशल इव्हेंटसचे आयोजन करण्यात आले होते. काहींनी सेलिब्रिटी कलावंतांचे शो ठेवले होते. बाहेरील भागात रिसॉर्ट, ओपन गार्डन, फार्म हाऊस, हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या जलसा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांनी विशेष प्लॅन करून या संपूर्ण आयोजनांमध्ये सहभाग घेतला.ट्रॅफिक पार्क परिसर फुलले‘थर्टी फर्स्ट’असल्यामुळे अनेक पालक आपल्या चिमुकल्यांना घेऊन ट्रॅफिक पार्कमध्ये आले होते. पार्कच्या बाहेर फुगे आणि खेळणी विकणाऱ्या दुकानांवर पालकांची गर्दी होती. रात्री १० वाजता अनेक पालक ट्रॅफिक पार्कमधून बाहेर पडले. ट्रॅफिक पार्कसमोरील गोलगप्पा आणि इतर हॉटेल्समध्येही बऱ्यापैकी गर्दीचे चित्र यामुळे अनुभवाला आले. या परिसरात तरुणांची संख्याही अधिक होती.अवघे शहर झाले पोलीस छावणी, ३५० च्यावर कारवाई 
नववर्षाचे स्वागत करा पण अनुचित प्रकार घडू नये, शहराच्या शांततेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. शहराला छावणीचे स्वरूप आले होते. फुटाळा तलाव परिसरासह विविध मार्गांवर बंदोबस्त लावण्यात आला. रस्त्यांवर जागोजागी बॅरिकेट लावून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. बाईकस्वार तरुणांच्या हुल्लडबाजीवर पोलिसांनी करडी नजर रोखली होती. वाहतूक पोलिसांच्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कारवाईमध्ये ३५० पेक्षा अधिक वाहनचालकांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या अंतर्गत अटक केली. संशयितांचीही धरपकड करण्यात आली. बाहेरच्या वाहनांना तपासणीनंतरच शहरात प्रवेश दिला गेला. गर्दी होणाऱ्या धरमपेठ, सदर, शंकरनगर आदी परिसरात पोलिसांची गस्त वाढलेली दिसली.पोलीस आयुक्तांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा 
दरम्यान शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सीताबर्डी व व्हेरायटी चौक परिसरात वाहनचालकांना गुलाब पूष्प देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्षाचा जल्लोष पाहता आयुक्तांनी शहरातील चौक, सिग्नल व रस्त्यांवर पोहचत नागरिकांशी संवाद साधला.घरी आणि आसपास मोहल्ला पार्टीपोलिसांचा चोख बंदोबस्त पाहता सेलिब्रेशनच्या मूडमध्ये विघ्न येऊ नये म्हणून बहुतेकांनी घरीच पार्टीचे आयोजन केले. सायंकाळी पावसामुळे हिरमोड केला होता मात्र नंतर उघाड मिळाल्याने उत्साह वाढला. अनेकांनी कौटुंबिक सेलिब्रेशनलाच महत्त्व दिले. घरात सर्वांसोबत नववर्ष साजरे करण्यात आले. याशिवाय अनेकांनी परिसरातील आसपासच्या लोकांना, मित्रांना घेऊन मोहल्ला पार्टीचे जंगी आयोजन केले होते. डीजे लावून रात्रीपर्यंत हा जल्लोष चालला होता. बाहेर पार्टीला गेल्यावर रस्त्यावर अपघात किंवा इतर कोणता अनुचित प्रकार होऊ नये म्हणून घरातील पार्टीला बहुतेकांची पसंती होती.‘इयर २०२०’ सोबत सेल्फी  
धरमपेठ परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले ‘इयर २०२०’ चे मोठे कटआऊट लोकांना आकर्षित करीत होते. तरुण-तरुणींनी उत्साहात या नववर्षाच्या कटआऊटसमोर उभे राहत सेल्फी काढून घेतली आणि स्टेटसवर शेअर केली. धरमपेठ परिसरात रात्री उशिरापर्यंत नवीन वर्षाचा उत्साह चाललेला होता. कुटुंबासह आलेले लोक हातात मोठे बलून्स व मिठाई घेत नववर्ष स्वागत करताना दिसून आले.

टॅग्स :New Yearनववर्षnagpurनागपूर