शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:26 IST

उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.

ठळक मुद्देजीवघेणे तापमान : बळी उष्माघाताचेच?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे.बँक कॉलनी नरसाळा येथील ५० वर्षीय प्रवीण कडू एस.टी. मध्ये कंडक्टर आहे. ते मंगळवारी सकाळी एसटी स्टँड परिसरातील कार्यालयात टिनाच्या शेडजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंबाझरी चौपाटीजवळ मंगळवारी सायंकाळी ४५ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. जरीपटका येथील नारी गावातील नाल्याजवळ ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. पाचपावलीतील राणी दुर्गावती चौकात फूटपाथवर अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. तहसील पोलीस ठाणे हद्द्ीत बोहरा बिल्डिंगजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. याच परिसरातील तीन नळ चौकातही ४० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडली. त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरंनी मृत घोषित केले.त्याचप्रकारे सक्करदरा परिसरातील आशीर्वादनगरात मंगळवारी दुपारी एक व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. तिला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विनोबा भावेनगर हुडकेश्वर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुकडे ले-आऊट अजनी येथील ५३ वर्षीय सुरेखा अशोक मोटघरे यांना मंगळवारी सकाळी नतेवाईकांनी झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजसमोर ६७ वर्षीय व्यक्ती आजारी अवस्थेत सापडली. मेडिकलमध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी तिचा मृत्यू झाला. मेडिकल गेटजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला.गेल्या पंधरवड्यापासून हा प्रकार सुरु आहे. यादरम्यान १०० पेक्षा अधिक लोकांचा वेगवेगळ्या कारणामुळे जीव गेला. रस्त्यावर सापडलेल्या अनेक मृतांची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे त्यांचे मृतदेह सांभाळून ठेवणे आणि अंत्यसंस्कार करण्यामुळे पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये या कामासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेतात ते न सापडल्यास मृतावर अंत्यसंस्कार करतात.

 

टॅग्स :Sun strokeउष्माघातDeathमृत्यूnagpurनागपूर