सावनेरात मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:34+5:302021-01-16T04:13:34+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : तालुक्यातील १२ पैकी जटामखाेरा वगळता ११ ग्रामपंचायतींमधील ९६ जागांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान घेण्यात ...

The turnout dropped in Savannah | सावनेरात मतदानाचा टक्का घसरला

सावनेरात मतदानाचा टक्का घसरला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : तालुक्यातील १२ पैकी जटामखाेरा वगळता ११ ग्रामपंचायतींमधील ९६ जागांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान घेण्यात आले. यात १४ जागांवरील उमेदवारांची अविराेध निवड करण्यात आल्याने उर्वरित २२६ उमेदवारांचे भवितव्य सायंकाळी मशीनबंद करण्यात आले. या गावांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४१.३३ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५६.५८ टक्के तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६९.३९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तालुक्यात जटामखाेरा ग्रामपंचायतची निवडणूक अविराेध झाली असून, खुबाळा, नांदाेरी, खुर्सापार, टेंभूरडाेह, गडमी, जैतपूर, साेनपूर, नरसाळा, पाेटा, पाटणसावंगी व सावंगी (हेटी) या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या गावांमधील एकूण ३०,२६१ मतदारांपैकी (यात १५,६४३ पुरुष व १४,६१८ महिला मतदारांचा समावेश आहे) ६९.३९ टक्के मतदारांनी मतदान केले. या सर्व गावांमध्ये सकाळी मतदानाचा ओघ कमी हाेता. सायंकाळी ५.३० वाजता ९६ जागांसाठी २२६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशीनबंद करण्यात आले.

तालुक्यातील पाेटा व पाटणसावंगी या ग्रामपंचायती अतिसंवेदनशील मानल्या जात असल्याने या ठिकाणी तगडा पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. पाेटा येथे रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू हाेते. अन्य ग्रामपंचायतींमध्ये सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान ईव्हीएम सील करण्यात आल्या. साेनपूर येथे काॅंग्रेस समर्थित पांडुरंग कुंभरे व नाराज असलेले काॅंग्रेस कार्यकर्ते बबन माहुरे यांच्या गटात सरळ लढत असली तरी माजी सैनिक राजेंद्र आत्राम यांच्या पॅनलमुळे निवडणुकीत रंगत आणली.

टेंभूरडाेह येथे काॅंग्रेस व भाजप समर्थित गटांमध्ये तर नांदाेरी येथे काॅंग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडी व भाजप समर्थित स्वतंत्र युवा आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. खुबाळा येथे माजी सरपंच यादव ठाकरे यांचे युवा ग्राम विकास आघाडी व वामन खुबाळकर, जितू खुबाळकर यांच्या किसान विकास आघाडीमध्ये थेट लढत आहे. पाटणसावंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे काॅंग्रेस समर्थित दाेन गट आमने-सामने असून, त्यात भाजप समर्थित सहकार पॅनलने चुरस वाढविली आहे. दरम्यान तालुक्यात कुठेही ईव्हीएम बंद पडल्याची किंवा अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.

...

जटामखाेरा अविराेध

सावनेर तालुक्यातील जटामखाेरा ग्रामपंचायतच्या सर्व जागा तसेच अन्य ग्रामपंचायतींमधील विविध प्रवर्गातील जागा अशा एकूण १४ जागांवरील उमेदवारांची अविराेध निवड करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील एकूण ११० जागांपैकी ९६ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या सर्व जागांसाठी एकूण २४० नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले हाेते. तालुक्यातील पाटणसावंगी व पाेटा ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वाची मानली जात असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The turnout dropped in Savannah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.