ग्रामीण भागातील भारनियमन बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:19+5:302020-12-02T04:11:19+5:30
जलालखेडा : रबी हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप सुरू केले आहेत. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना दिवसा ओलित ...

ग्रामीण भागातील भारनियमन बंद करा
जलालखेडा : रबी हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप सुरू केले आहेत. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना दिवसा ओलित करणे शक्य हाेत नसल्याने ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ग्रामीण भागात थ्री फेज व सिंगल फेज वीजपुरवठा केला जाताे. आठवड्यातील चार दिवस रात्री थ्री फेज वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना ओलित करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. अंधारात ओलित करणे धाेकादायक असून, थंडी वाढत असल्याने भारनियमन शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे ओलिताअभावी पिके धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने आठवडाभर २४ तास थ्री फेज अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.