शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले; नितीन गडकरी यांची केंद्राकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 01:31 IST

कठोर कारवाई करण्याची मागणी

नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) ‘सीईओ’पद बळकावले असल्याची गंभीर तक्रार गडकरी यांनी केंद्राकडे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी तसेच केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांना पत्र लिहिले आहे. मुंढे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी ‘एसव्हीपी’ची (स्पेशल पर्पज व्हेईकल) निर्मिती केली असून, याचे नेतृत्व पूर्णकालीन ‘सीईओ’ करेल अशी तरतूद आहे. यात केंद्र व राज्य शासनाच्या नामनिर्देशित सदस्यांचादेखील समावेश असतो. २०१३ च्या कंपनी अ‍ॅक्टनुसार ‘एनएसएससीडीसीएल’ची नोंदणी झाली असून, नागपूर मनपा व राज्य शासनाची ही संयुक्त कंपनी आहे.

केंद्र शासनाकडून अनुदानित ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला नुकसान पोहोचविण्याचा मुंढे यांचा मानस पूर्ण होऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.परदेशींना ‘सीईओ’ नियुक्तीचे अधिकारच नाहीबेकायदेशीररीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे ‘सीईओ’पद बळकावणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी चेअरमन प्रवीणसिंग परदेशी यांनी आपली नियुक्ती केल्याचा दावा प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र प्रत्यक्षात नियमानुसार परदेशी यांना चेअरमन या नात्याने ‘एनएसएससीडीसीएल’च्या ‘सीईओ’ची नियुक्ती करण्याचे अधिकारच नाहीत. तो अधिकार केवळ कंपनीच्या संचालक मंडळाकडे आहे, असे नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtukaram mundheतुकाराम मुंढे