शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

क्षयरोगाचा विळखा घट्ट होतोय; पूर्व विदर्भात आढळले ९२५८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:59 AM

देशात क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी २९ लाख नवे रुग्ण समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देएकट्या मेडिकलमध्ये १८१३ रुग्णांची नोंद

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी २९ लाख नवे रुग्ण समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. यात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील ९२५८ रुग्णांचा समावेश आहे. एकट्या मेडिकलमध्ये १८१३ रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक म्हणजे, यातील ३० टक्के रुग्ण हे तरुण आहेत.उपचारांमध्ये बरीच प्रगती झाली असली तरी क्षयरोग हा प्रथम क्रमांकाचा जीवघेणा रोग आजही कायम आहे. जगात या रोगाने रोज ४५०० रुग्णांचा मृत्यू होतो. यातच हे जंतू विविध औषधांना प्रतिरोध निर्माण होऊन दाद देत नसल्याने एका मोठ्या महाभयानक परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांतील पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील आकडेवारी पाहता रुग्णांच्या संख्येत फारसा बदल झालेला नसल्याचे चित्र आहे. २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग हद्दपार करण्याचे आरोग्य विभागाचे लक्ष्य आहे. जास्तीत जास्त रुग्णांना शोधून काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु तूर्तास तरी रुग्णांच्या उपलब्ध संख्येवरून हे लक्ष्य दूर असल्याचे बोलले जात आहे.

सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात२०१४ ते २०१७ या वर्षांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांची आकडेवारी पाहता सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये २१७७, २०१५मध्ये २२६०, २०१६मध्ये २१६३ तर २०१७मध्ये २२६५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर नागपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये २३५२, २०१५मध्ये २०८१, २०१६ मध्ये १८४२ तर २०१७मध्ये २०४३ रुग्ण आढळून आले आहेत.

चार वर्षांत रुग्णसंख्या सारखीचभंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या सहा जिल्ह्यातील गेल्या चार वर्षांमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांच्या आकडेवारीत फार जास्त बदल झालेला दिसून येत नाही. सहा जिल्हे मिळून २०१४ मध्ये ९४१६, २०१५मध्ये ९३३५, २०१६मध्ये ८९०० तर २०१७मध्ये ९२५८ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २०१६ मध्ये १५९४ तर २०१७ मध्ये १८१३ रुग्ण आढळून आले आहेत. यात ‘मल्टिड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’च्या रुग्णांची संख्या (एमडीआर-टीबी) ४७ तर गेल्यावर्षी ५६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) रुग्णांची संख्या दोन्ही वर्षी दोन-दोन होती.

रुग्ण शोधण्याचे प्रमाण वाढलेआरोग्य विभागाकडून रुग्ण शोधण्यांचे प्रमाण वाढले आहे. जास्तीत जास्त रुग्ण औषधोपचाराखाली आणले जात आहे. यामुळे आताजरी रुग्णसंख्या कमी झालेली दिसणार नाही, तरी काही वर्षांत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे, बरे झालेले रुग्ण पुन्हा व्यसनाकडे वळत असल्याने क्षयरोगाच्या औषधांना प्रतिरोध निर्माण होत आहे. क्षयरोगांमध्ये तरुण रुग्णांची संख्या ३० टक्के आहे.-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, रेस्पिरेटरी मेडिसीन विभाग, मेडिकल

टॅग्स :Healthआरोग्य