टीटीएलमुळे १४ व्या मजल्यापर्यंत आगीवर नियंत्रण शक्य

By Admin | Updated: June 23, 2017 02:28 IST2017-06-23T02:28:54+5:302017-06-23T02:28:54+5:30

नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. याचा विचार करता महापालिकेचा

TTL enables fire control to the 14th floor till the 14th floor | टीटीएलमुळे १४ व्या मजल्यापर्यंत आगीवर नियंत्रण शक्य

टीटीएलमुळे १४ व्या मजल्यापर्यंत आगीवर नियंत्रण शक्य

विभागाची क्षमता वाढली े स्वयंचलित असल्याने सहज वापर े अग्निशमन विभागाची वाढली शान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. याचा विचार करता महापालिकेचा अग्निशमन विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातूनच गेल्या सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल) दाखल झाले आहे. आता ४२ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतीतील आग नियंत्रणात आणणे सहज शक्य झाल्याने टीटीएलने विभागाची शान वाढली आहे.

युरोपीयन निकष पूर्ण करीत असलेली अग्निशमन विभागाची वाहने सर्वोत्तम मानली जातात. असे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने आॅस्ट्रियाच्या रोजर बावर कंपनीकडून टीटीएल खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेला यावर आठ कोटी रुपये खर्च करावे लागले. टीटीएलचा वापर करण्यासाठी अग्निशमन विभागातील जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. टीटीएलचा पुरवठा केल्यापासून तीन वर्षांपर्यंत या मशीनची देखभाल रोजर बावर कंपनीकडे राहणार आहे. तीन वर्षे या मशीनचा वॉरंटी कालावधी आहे. त्याशिवाय विभागाने आणखी पाच वर्षे एक व्यापक देखभाल करार केला आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे महापालिकेला आठ वर्षांसाठी मोफत देखभाल मिळणार आहे.

स्नोर्कल खरेदीचाही प्रस्ताव
टीटीएल खरेदी करण्याचा प्रस्ताव २००९ साली तयार करण्यात आला होता. विभागाकडे १५ मीटर क्षमतेच्या स्नोर्कल उपलब्ध आहेत. परंतु शहरातील उंच इमारतीची संख्या विचारात घेता विभागाने ३२ मीटर क्षमतेच्या स्नोर्कल खरेदीचाही प्रस्ताव सादर केला आहे.
टीटीएल सर्व दिशांना फिरते
टीटीएलमध्ये स्वयंचलित यंत्रणा आहे. ती एकाच जागेवरून सर्व दिशांना फिरते. त्यामुळे आग आटोक्यात आणताना अडचण येत नाही. एका जागेवर टीटीएल उभी केल्यानंतर सभोवतालच्या उंच इमारतीतील आग आटोक्यात आणणे शक्य झाले आहे.
सात ते आठ जवानांना काम करणे शक्य
उंच इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणताना मनुष्यबळाची गरज असते. टीटीएलमध्ये एकाचवेळी सात ते आठ जवानांना काम करता येईल, अशी सुविधा आहे. त्यामुळे आग कमी वेळात आटोक्यात आणणे शक्य होते.

५६ मीटर क्षमतेच्या गाडीची गरज
नागपूर शहराचा चौफेर विकास होत असल्याने ५० ते ६० मीटरपर्यंत उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. याचा विचार करता अग्निशमन विभागाला ५६ मीटर उंचीवरील आग आटोक्यात आणण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक गाडीची गरज आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

पाण्याला २०० किलो वजनाचा दाब
आग आटोक्यात आणताना पाण्याचा वापर करावा लागतो. टीटीएलमध्ये २०० किलो वजनाच्या दाबाने पाण्याचा मारा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आणता येते.
उंचीवर काम करण्याची क्षमता
टीटीएलची ४२ मीटरपर्यंतच्या उंचीवरील आग आटोक्यात आणण्याची क्षमता आहे. सोबतच उंचीवरील आग आटोक्यात आणताना जवानांना व्यवस्थित काम करता येते. त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही.
१२.५ मीटर लांबी
टीटीएलची क्षमता ४२ मीटरची असली तरी या गाडीची लांबी १२.५ मीटर तर उंची ३.५ मीटर आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर चालविता कोणताही अडथळा येत नाही.

Web Title: TTL enables fire control to the 14th floor till the 14th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.