शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

टेक्नॉलॉजीच्या त्सुुनामीने ग्रामीण व्यवस्था नष्ट होतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 21:41 IST

आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्यच राहिले नाही. गावात वीज, वाहने, खत, यंत्र सर्व शहरातून येते. गावातील मुलेसुद्धा पुढचे शिक्षण शहरातच घेतात. त्यामुळे गावातील लोकसंख्या, उत्पन्न घटत चालले आहे. त्यामुळे कुठलीही नवीन गुंतवणूक ग्रामीण अर्थव्यवस्थेत टिकाव धरू शकत नाही, असे मत आयआयएम बेंगळुरूचे अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भारत झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. भारत झुनझुनवाला : विणू काळे मेमोरिअल सेमिनार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चिटणवीस सेंटरमध्ये विणू काळे मेमोरिअल सेमिनारमध्ये मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला हाऊसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हलपमेंट बोर्डाचे संचालक आर्किटेक कीर्ती शहा व वेणू भारती फाऊंडेशनचे वैभव काळे उपस्थित होते. यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना डॉ. झुनझुनवाला म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाच्या उत्पन्नात कृषीचा वाटा ९० टक्के होता. तेव्हा ९० टक्के जनता गावात वास्तव्यास होती. आता देशाच्या उत्पन्नात कृषीचा वाटा १८ टक्के झाला आहे. तर गावात ४० टक्के जनता वास्तव्यास आहे. कारण गावामध्ये उत्पन्नाचे साधन संपलेले आहे. जमिनीची उत्पादन क्षमता सिमित आहे. कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन थांबले आहे. त्यामुळे अशा बकाल ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवीन गुंतवणूक टिकाव धरू शकणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जुळलेला बांबू येथे टिकाव धरू शकणार नाही. उलट शहरात बांबू व्यवसाय प्रगती करू शकतो. त्यासाठी बांबूवर संशोधन होणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बांबूची उपयोगिता वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी बांबू संशोधन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे. यावेळी बोलताना आर्किटेक कीर्ती शहा म्हणाले की, केंद्र सरकार ग्रामीण आवास योजनेवर मोठा खर्च करीत आहे. ६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ५० हजार घरे बांधण्यात आली आहेत. एवढी मोठी योजना राबविताना यात कुठलाही बिल्डर, आर्किटेक, कॉन्ट्रॅक्टर वापरण्यात आले नाही. गावातील व्यक्तीच घर बांधतो आहे. या आवास योजनांमध्ये बांबू टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग होईल, बांबूपासून कमी खर्चात कसे टिकाऊ आणि मजबूत घर बांधता येईल, याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे संचालन वैभव काळे यांनी केले.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासnagpurनागपूर