पुन्हा सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST2021-09-21T04:09:53+5:302021-09-21T04:09:53+5:30

पिपळा (डाक बंगला) : पिपळा डाक बंगला (ता. सावनेर) येथे बंदुकीच्या धाकावर तुलसी ज्वेलर्स सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न १८ ...

Trying to rob a bullion shop again | पुन्हा सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न

पुन्हा सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न

पिपळा (डाक बंगला) : पिपळा डाक बंगला (ता. सावनेर) येथे बंदुकीच्या धाकावर तुलसी ज्वेलर्स सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न १८ ऑगस्टला झाला होता. या दुकानाच्या समोर विरुद्ध दिशेला असलेले निहारिका ज्वेलर्स येथे रविवारच्या (दि.१९) मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्याने सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.

प्राप्त माहितीनुसार, रवींद्र महादेव मुसळे रा. नांदा कोराडी (ता. कामठी) यांचे पिपळा मेन रोड येथे निहारिका ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री दोन अज्ञात चोर मोटरसायकलने सावनेरच्या दिशेने पिपळा येथे आले. त्यांनी निहारिका ज्वेलर्स येथे दुकानाच्या चॅनल गेटचे एक लॉक तोडले असता त्यांची नजर दुकानाबाहेरील सीसीटीव्हीवर पडली. त्यांनी लगेच बाहेरील दोन सीसीटीव्ही तोडले तसेच ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर असलेल्या पॅरेडाईज कॉम्प्युटर येथे सीसीटीव्ही कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसल्याने चोरटे सावनेर दिशेने पळाले. मात्र एका महिन्यात सराफा दुकानात चोरीचा दुसऱ्यांदा प्रयत्न झाल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

Web Title: Trying to rob a bullion shop again