पत्रकाराला फसविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: October 14, 2016 03:19 IST2016-10-14T03:19:14+5:302016-10-14T03:19:14+5:30

मानकापूर येथे ५ आॅक्टोबर रोजी २ मुलांचा गळा कापण्याची घटना घडली होती. या घटनेचे वार्तांकन करणारे लोकमतचे पत्रकार जगदीश जोशी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून

Trying to deceive the journalist | पत्रकाराला फसविण्याचा प्रयत्न

पत्रकाराला फसविण्याचा प्रयत्न

नागपूर : मानकापूर येथे ५ आॅक्टोबर रोजी २ मुलांचा गळा कापण्याची घटना घडली होती. या घटनेचे वार्तांकन करणारे लोकमतचे पत्रकार जगदीश जोशी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून त्यांना फसविण्याचा प्रयत्न एका महिलेने केला आहे. माझ्या सन्मानाला ठेच पोहचविणारे प्रश्न जोशी यांनी विचारल्याचा महिलेचा आरोप आहे.
महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, मी मेयो रुग्णालयात असताना जगदीश जोशी तेथे आले. त्यांनी काही प्रश्न विचारले. त्यामुळे माझ्या सन्मानाला ठेच पोहचली. ५ आॅक्टोबरला मानकापूर गीतानगरात आरोपी विलास भागवत भुजाडे याने दोन मुलांचा गळा कापून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला लोकमतसह शहरातील इतरही वृत्तपत्रांनी प्रामुख्याने प्रकाशित केले होते. या घटनेचे कारण अनैतिक संबंध अथवा पैशाची देवाणघेवाण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. १३ आॅक्टोबर रोजी या महिलेने तहसील पोलीस ठाण्यात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत वापरण्यात आलेली भाषा महिला खुद्द वाचू शकणार नाही अशीच आहे. कुणीतरी ही तक्रार लिहून दिली असावी हे यावरून स्पष्ट होते. सध्या तहसिल पोलिसांनी प्रकरणाची चौकशी न करता जगदीश जोशी यांच्या विरोधात कलम ३५४ (अ/४) व ५०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
आपली बाजू मांडताना जगदीश जोशी यांनी सांगितले की, मी या महिलेला ओळखत नाही. अन्य पत्रकारांसोबत या प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी मेयो रुग्णालयात गेलो होतो. या ठिकाणी कोण महिला उपस्थित होती हे सुद्धा मला माहीत नाही. ही बाब मेयो रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्हीद्वारे सिद्ध होऊ शकते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी. कुणाला खोट्या प्रकरणात फसविणे हा सुद्धा अपराध असल्याचे कदाचित या महिलेला माहीत नसावे. (प्रतिनिधी)

Web Title: Trying to deceive the journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.