शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील स्पाईनल इन्ज्युरी सेंटरसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:14 IST

मेडिकल प्रशासनाने पुन्हा ‘स्टेट स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’ च्या मंजुरीसह बांधकाम व मनुष्यबळाला प्रशासकीय परवानगीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यास ‘स्पाईनल इन्ज्युरी’च्या रुग्णांना विशेष सेवा देणारे हे मध्यभारतातील पहिले सेंटर असणार आहे.

ठळक मुद्देमेडिकलने पुन्हा पाठविला प्रस्ताव : पाठीच्या कणाच्या जखमी रुग्णावर विशेष उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढते अपघात, जोखमीचे शारीरिक खेळ व आजारामुळे पाठीच्या कण्याला इजा होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात बहुसंख्य जखमींवर उर्वरित आयुष्य खाटेवर किंवा व्हीलचेअरवर घालवावे लागते. याला गंभीरतेने घेत केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाच्या पुढाकाराने नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘स्टेट स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’ उभारण्याला मंजुरी देण्यात आली होती. परंतु निधीला घेऊन घोळ निर्माण झाल्याने हे ‘सेंटर’ रखडले होते. यामुळे मेडिकल प्रशासनाने पुन्हा या ‘सेंटर’च्या मंजुरीसह बांधकाम व मनुष्यबळाला प्रशासकीय परवानगीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यास ‘स्पाईनल इन्ज्युरी’च्या रुग्णांना विशेष सेवा देणारे हे मध्यभारतातील पहिले सेंटर असणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात येणाऱ्या  रुग्णांची संख्या फार मोठी आहे. या विभागांतर्गत इतर महत्त्वाच्या शस्त्रक्रियासोबतच पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया केली जाते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्पाईनल सर्जरी करण्याची सोय नाही. यावर हे प्रस्तावित सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या सेंटरमध्ये पाठीच्या कण्यासह, मणक्याची बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया होतील. रेडिओफ्रिक्वेन्सी लहरी व लेझर या प्रगत-शास्त्रीय उपकरणांद्वारे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता रुग्ण वेदनामुक्त शस्त्रक्रिया येथे होतील. एक्स-रे (सी-आर्म) वर सुईचे टोकाद्वारे मणक्यावर शस्त्रक्रिया होतील.वर्षभरापासून प्रस्ताव रखडला‘स्टेट स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’ नागपूरच्या मेडिकलमध्ये होण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. यामुळेच केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाने २६ एप्रिल २०१७ रोजी राज्य शासनाला पत्र लिहून या प्रकल्पासंदर्भात विचारणा केली होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन देखील हे केंद्र उभारण्यासंदर्भात आग्रही होते. परंतु केंद्राकडून निधीला घेऊन घोळ झाल्याने हा प्रकल्प रखडला होता. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा व पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅण्ड ह्युमन्स रिसोर्सेसचे संचालक डॉ.विरल कामदार यांनी यात पुढाकार घेऊन पुन्हा नव्या स्वरुपातील प्रस्ताव तयार करून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला.मेडिकलच्या ‘स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’चा प्रस्ताव नव्याने पाठविण्यात आला आहे. १५ हजार स्क्वेअर मीटरच्या जागेवर हे सेंटर प्रस्तावित असून साधारण ८ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या ‘सेंटर’ला मंजुरी मिळाल्यास मध्यभारतातील रुग्णांसाठी वरदान ठरेल.-डॉ. विरल कामदारसंचालक, दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅण्ड ह्युमन्स रिसोर्सेस

 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर