शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गुरूनानकजयंतीनिमित्त करून पहा कडाप्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 10:03 IST

आज गुरूनानकजयंतीनिमित्त जगभरातील गुरुद्वारांमध्ये कडाप्रसाद शिजवला जाईल. भक्तगण मोठ्या आदराने त्याचे ग्रहण करतील.

 नागपूर: आज गुरूनानकजयंतीनिमित्त जगभरातील गुरुद्वारांमध्ये कडाप्रसाद शिजवला जाईल. भक्तगण मोठ्या आदराने त्याचे ग्रहण करतील. कडाप्रसाद म्हणजे कणकेच्या पीठाचा अतिशय मधुर असा शिरा. तसं पाहिलं तर शिरा हा देशाच्या विभिन्न प्रांतात विविध पद्धतीने बनवला जातो. हा कडा प्रसाद घरीच कसा बनवायचा हे आपण आता पाहू. बनवायला अतिशय सोपा असलेल्या या पदार्थाचे एकच सूत्र लक्षात ठेवायचे. ते म्हणजे १:१:१:२ असे प्रमाण.साहित्य- एक वाटी गव्हाची कणीक, एक वाटी साखर, एक वाटी तूप, दोन वाट्या पाणी.कृती- दोन वाट्या पाणी पातेल्यात घालून ते गरम झाले की त्यात एक वाटी साखर घालून चांगले ढवळावे. साखर विरघळली की खाली उतरवून ठेवावे. ते आटू देऊ नये.दुसऱ्या कढईत एक वाटी तूप गरम करून त्यात एक वाटी कणीक घालावी. ही कणीक मंद आचेवर शिजवावी. सतत हलवत रहावे लागते. ते सोडून दुसरे कुठलेही काम करू नये. कारण कणिक फार चटकन खाली लागण्याची शक्यता असते. हळूहळू कणकेचा रंग बदलत जातो. तो क्रमश: हलका तपकिरी, मध्यम हलका तपकिरी आणि सरतेशेवटी गडद तपकिरी होतो. कणिक शिजली की नाही याची खूण म्हणजे, त्या कणकेला रवाळपण येते. रवाळपण आले की समजायचे पुरेसे भाजले गेले आहे म्हणून. मग त्यात साखरेचे पाणी घालायचे. सतत ढवळत रहायचे. हळूहळू त्याला तूप सुटू लागते. जरा सैलसर घट्टपण आले की आचेवरून खाली उतरवायचे. वरून सुकामेव्याची सजावट करायची. मस्तपैकी कडाप्रसाद तयार..

टॅग्स :foodअन्न