भरधाव ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:04+5:302021-05-25T04:09:04+5:30
दाेघे जखमी : बुटीबाेरी येथील उड्डाण पुुलावरील घटना लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबोरी : राजस्थानमधून तेलंगणामध्ये तेंदूपत्ता घेऊन जाणारा ट्रक ...

भरधाव ट्रक उलटला
दाेघे जखमी : बुटीबाेरी येथील उड्डाण पुुलावरील घटना
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबोरी : राजस्थानमधून तेलंगणामध्ये तेंदूपत्ता घेऊन जाणारा ट्रक बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) येथील उड्डाण पुलावर पाेहाेचताच चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव ट्रक उड्डाण पुलाच्या मध्यभागी उलटला. यात ट्रकचालक व क्लिनर जखमी झाले. ही घटना साेमवारी (दि. २४) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. राणू यादव (३५) व फुलचंद काेरी (२७, दाेघेही रा. सागर, मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे आहेत. राणू हा ट्रकचालक तर फुलचंद क्लिनर आहे. ते दाेघेही एमपी-१५/एचए-५०८५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये तेंदूपत्ता घेऊन पाटण (जिल्हा झालावाड, राजस्थान) येथून निजामाबाद (तेलंगणा) येथे नागपूर मार्गे जायला निघाले. ते साेमवारी दुपारी नागपूर-वर्धा मार्गावरील बुटीबाेरी येथील नवीन तयार करण्यात आलेल्या उड्डाण पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव ट्रक पुलाच्या मध्यभागी उलटला.
हा ट्रक उलटला त्यावेळी उड्डाण पुलावरून काेणतीही वाहने जात नसल्याने अनर्थ टळला. शिवाय, यात ट्रकचालक व क्लिनर दाेघेही जखमी झाले. या मार्गावरून जाणाऱ्यांनी दाेन्ही जखमींना लगेच बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची व्यवस्था केली. त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. वृत्त लिहिस्ताे या घटनेची बुटीबाेरी पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली नव्हती.
===Photopath===
240521\img_20210524_184457.jpg
===Caption===
तेंडुपत्याचा ट्रक पलटला