शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस उपायुक्तांच्या कारला ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:27 IST

सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलीस उपायुक्तांच्या शासकीय कारला ट्रकचालकाने धडक मारली. कारमध्ये परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल बसून होते. प्रसंगावधान राखून ते दुसऱ्या दिशेला सरकल्याने त्यांना किंवा कारमधील कुणालाच दुखापत झाली नाही.

ठळक मुद्देकारचे नुकसान : सुदैवाने मोठा अपघात टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलीस उपायुक्तांच्या शासकीय कारला ट्रकचालकाने धडक मारली. कारमध्ये परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल बसून होते. प्रसंगावधान राखून ते दुसऱ्या दिशेला सरकल्याने त्यांना किंवा कारमधील कुणालाच दुखापत झाली नाही.पोलीस उपायुक्त नीलोत्पल शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मार्टिन नगर ते आॅटोमोटिव्ह चौक मार्गावरून शासकीय कारने जात होते. खोब्रागडे चौकातील सिग्नल बंद असल्याने चालकाने कार उभी केली. तेवढ्यात घाईगडबडीत आलेल्या एका ट्रक चालकाने या कारला धडक मारली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. कारमध्ये बसून असलेले पोलीस उपायुक्त नीलोत्पल, त्यांचा गार्ड आणि वाहन चालक या तिघांपैकी कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. कारला धडक लागल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने ट्रक बंद केला. सिग्नल वरील इतर वाहनचालकांनी त्याच्याकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन नागरिकांच्या मारहाणीपासून त्याचा बचाव केला. आरोपी ट्रकचालकाचे नाव शेख जफुल शेख हबीब असे असून तो पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. जरीपटका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस