शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:14 IST

वाहनात डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून तीन लुटारूंनी त्याला गंभीर जखमी केले. यानंतर लुटारूंनी त्याच्या जवळचे चार हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला.

ठळक मुद्देचाकूने हल्ला, गंभीर जखमी : जरीपटक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनात डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून तीन लुटारूंनी त्याला गंभीर जखमी केले. यानंतर लुटारूंनी त्याच्या जवळचे चार हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ ही थरारक घटना घडली. पंकज राम अवतार कुशवा (वय ३१) असे जखमी चालकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील करलीजर नरजनी (जि. बांदा) येथील रहिवासी आहे.शनिवारी रात्री तो माल घेऊन नागपुरात आला होता. माल खाली केल्यानंतर त्याने येथे मुक्काम केला. रविवारी त्याला वाडीतील ट्रान्सपोर्टकडे जायचे होते. त्यामुळे रात्री ११ च्या सुमारास तो जरीपटक्याच्या मार्टिन नगरातील भारत पेट्रोल पंपाजवळ थांबला. तेथे तो वाहनातील डिझेल बघत असताना तीन लुटारू त्याच्याजवळ आले. एका आरोपीने पंकजला १० हजार रुपये मागितले तर दुसऱ्या आरोपीने पाच हजार रुपये मागितले. तिसºया आरोपीने गाडीची कागदपत्रे मागितली. पंकजने त्यांना तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे आहात, असे विचारले असता आरोपीने शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. तो प्रतिकार करत असल्याचे पाहून एका आरोपीने जवळचा चाकू काढून त्याच्यावर हल्ला चढवला. पोटावर, छातीवर मागच्या बाजूला वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर पंकजच्या पाकीटमधील चार हजार रुपये आणि मोबाईल असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून आरोपी पळून गेले. पंकज आणि त्याच्या सहकाऱ्याने मदतीसाठी आरडाओरड केल्याने बाजूची मंडळी धावली. त्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पंकजला सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. जरीपटका पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Robberyचोरीnagpurनागपूर