डिझेल चाेरणाऱ्या ट्रकचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:09 IST2021-05-13T04:09:21+5:302021-05-13T04:09:21+5:30

कुही : कामाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या टिप्परमधील डिझेल चाेरी करणाऱ्या ट्रकचालकास अटक करण्यात आली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या ...

Truck driver arrested for stealing diesel | डिझेल चाेरणाऱ्या ट्रकचालकास अटक

डिझेल चाेरणाऱ्या ट्रकचालकास अटक

कुही : कामाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या टिप्परमधील डिझेल चाेरी करणाऱ्या ट्रकचालकास अटक करण्यात आली. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव शिवारात बुधवारी उघडकीस आली.

दीपक इंगळे (३२, रा. प्लाॅट नं. २१, न्यू नाका नं. ७, उमरेड राेड नागपूर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. उमरेड-नागपूर मार्गावरील पाचगाव शिवारात डी.पी. जैन कंपनीचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी एमएच-४०/एके-६६४३ क्रमांकाच्या टिप्परचा चालक दीपक हा कंपनीच्या परवानगीशिवाय टिप्परमधील डिझेल नळीच्या साह्याने काढताना आढळून आला. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, ५११ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे. पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक भारत थिटे करीत आहेत.

Web Title: Truck driver arrested for stealing diesel