बैल आडवा आल्याने ट्रक बसवर आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST2021-07-26T04:08:34+5:302021-07-26T04:08:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : बैल आडवा आल्याने चालकाने बसचे ब्रेक दाबले. त्यातच मागे असलेल्या चालकास ट्रक नियंत्रित करणे ...

बैल आडवा आल्याने ट्रक बसवर आदळला
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : बैल आडवा आल्याने चालकाने बसचे ब्रेक दाबले. त्यातच मागे असलेल्या चालकास ट्रक नियंत्रित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ट्रक बसच्या तर कार ट्रकच्या मागच्या भागावर आदळली. यात ट्रकचालक जखमी झाला. ही घटना काेंढाळी नजीकच्या दुधाळा येथील जाम नदीच्या पुलावर रविवारी (दि. २५) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
गोविंदसिंग भूपेद्रसिंग चव्हाण (२५, उत्तर प्रदेश) असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. बसचालक सतीश प्रभाकर घाेटे (३४, रा. गिट्टीखदान, नागपूर) हे एमएच-४०/एक्यू-६४२६ क्रमांकाची नागपूर आगाराच्या बसमध्ये प्रवासी घेऊन नागपूरहून अमरावतीला जात हाेते. ते काेंढाळी (ता. काटाेल) नजीकच्या दुधाळा (ता. काटाेल) येथील जाम नदीच्या पुलावर पाेहाेचताच बसला बैल आडवा गेला. त्याला वाचविण्यासाठी सतीश घाेटे यांनी अचानक बसचे ब्रेक दाबले.
याच बसच्या मागे एमएच-१८/बीजी-०११२ क्रमांकाचा ट्रक नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जात हाेता. ब्रेक दाबल्याने बसचा वेग अचानक कमी झाला. दाेन्ही वाहनातील अंतर कमी असल्याने ट्रकचालकास ट्रकचे वेळीच ब्रेक दाबणे शक्य झाले नाही. त्यामुळे हा ट्रक बसच्या मागच्या भागाला धडकला. याच ट्रकच्या मागे पाेलीस अधिकारी अशोक हिंमतराव धुगे (५५, अंबरवाडी) हे त्यांच्या एमएच-२०/एफपी-४०५५ क्रमांकाच्या कारमध्ये हाेते. त्यांचीही कार ट्रकच्या मागच्या भागावर आदळली.
या अपघातात ट्रकचालक व बसमधील महिला प्रवासी किरकाेळ जखमी झाली. त्यांच्यावर काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास हेडकाॅन्स्टेबल दारासिंग राठोड व पोलीस नायक उमेश पातुर्डे करीत आहेत.