टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:11 IST2021-08-20T04:11:27+5:302021-08-20T04:11:27+5:30

हिंगणा : टोमॅटो घेऊन जाणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रकखाली दबून क्लिनरचा जागीच मृत्यू झाला ...

The truck carrying the tomatoes overturned | टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला

टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटला

हिंगणा : टोमॅटो घेऊन जाणारा भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रकखाली दबून क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर चालक व एक प्रवासी जखमी झाला. वर्धा मार्गावर डोंगरगाव शिवारात गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा नात्थुसिंग राठोड (३२) रा. मुरैना, मध्य प्रदेश असे मृताचे तर चालक चंद्रपालसिंग तोमर व सचिन राठोड, अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्र.आर.जे.-११ जी.बी.-४३०४ अनंतपुरम येथून टोमॅटो भरून ग्वाल्हेरला जात असताना डोंगरगावजवळ ट्रकसमोर वाहन थांबल्याने तात्काळ थांबण्यासाठी ब्रेक मारला. मात्र ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या बाजूला असलेल्या नालीत उलटला. यात क्लिनर कृष्णा खाली पडला. ट्रकखाली टोमॅटोने भरलेल्या ढिगाऱ्यात दबून त्याचा मृत्यू झाला. यात चालक तोमर याला गंभीर दुखापत झाली. त्याला बुटीबोरी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेला सचिन मधात आल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुथे, पोलीस कर्मचारी संजय तिवारी, सिद्धार्थ तामगाडगे, अरुण इंगळे, गौरव पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टोल प्लाझा हायवे पेट्रोलिंग पथकाचे विनोद पाठक, दिलीप परमे, येतेंद्र भिमटे, अश्फाक अली, सिद्धार्थ नंदेश्वर, अश्फाक खान, उत्तम जीवने यांच्या मदतीने टोमॅटोच्या बॉक्सखाली दबलेला मृतदेह व जखमीला बाहेर काढले.

Web Title: The truck carrying the tomatoes overturned