बनावट कर्ज प्रकरणाने बँक अधिकारी अडचणीत

By Admin | Updated: November 14, 2016 02:37 IST2016-11-14T02:37:27+5:302016-11-14T02:37:27+5:30

बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पत्नीच्या नावे दहा लाखांचे कर्ज उचलणाऱ्या रजनीश अयोध्याप्रसाद सिंह (वय ४३, रा. त्रिमूर्तीनगर)

Troubles with Bankruptcy Officer | बनावट कर्ज प्रकरणाने बँक अधिकारी अडचणीत

बनावट कर्ज प्रकरणाने बँक अधिकारी अडचणीत

पत्नीची तक्रार : पतीसह बँक अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल
नागपूर : बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पत्नीच्या नावे दहा लाखांचे कर्ज उचलणाऱ्या रजनीश अयोध्याप्रसाद सिंह (वय ४३, रा. त्रिमूर्तीनगर) याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात रजनीशला मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एचडीएफसी बँक आणि युको बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल केल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरोपी रजनीश याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नाही. त्यामुळे त्याची पत्नी सुनीता रजनीश सिंह (वय ४०) या काटोल मार्गावरील उत्कर्षनगरात राहतात. १२ मे २०१६ ला आरोपी रजनीशने सुनीता यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर सुनीता यांच्या बनावट सह्या करून १० लाखांचे व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) उचलले. आरोपीने ही कर्जाची रक्कम परस्पर युको बँकेच्या आपल्या खात्यात वळती करून वापरली. (प्रतिनिधी)


सारेच संशयास्पद
१० लाखांचे कर्ज ज्या व्यक्तीच्या नावे दिले जाते, त्या व्यक्तीला बँक अधिकाऱ्यांनी कधीही विचारणा केली नाही. ती व्यक्ती कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बँकेत हजर झाली नाही. तरीसुद्धा बँक अधिकाऱ्यांनी १० लाखांसारखे मोठे कर्ज देताना कागदपत्रांची, सह्याची शहानिशा केली नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ही रक्कम नंतर एचडीएफसीतून युको बँकेच्या खात्यात वळती करण्यात आली. या सर्व बाबी सुनीता यांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर सदर पोलीस ठाण्यात रजनीश सिंह याच्यासोबतच पोलिसांनी एचडीएफसी आणि युको बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Troubles with Bankruptcy Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.