शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूला घेऊन नागपूरच्या मेडिकल इस्पितळामध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:58 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या(मेडिकल)सर्जरी कॅज्युल्टीमध्ये शनिवारी सायंकाळी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृताच्या नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला.

ठळक मुद्देसर्जरी कॅज्युल्टीचे प्रवेशद्वार करावे लागले बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या(मेडिकल)सर्जरी कॅज्युल्टीमध्ये शनिवारी सायंकाळी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृताच्या नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्यांना बाहेरच थोपविण्यासाठी कॅज्युल्टीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास रेशीमबागस्थित मेहंदी लॉनजवळ दोन दुचाकींची आमोरासमोर टक्कर झाली. यात महाल दसरा रोड निवासी शेख अदीम व सय्यद अरशद जखमी झाले. या दोघांना मेडिकलच्या सर्जरी कॅज्युल्टीमध्ये साधारणत: ३.४० वाजता दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शेख अदीम याचा मृत्यू झाला तर सय्यद अरशद यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येते. सध्या त्याच्यावर मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अदीम याच्या मृत्यूला घेऊन नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी उपचाराच्या वेळी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हते, जेव्हा त्यांना बोलविण्यात आले तेव्हा त्यांनी सहकार्य केले नाही, उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळेच अदीम यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान मृताचे नातेवाईक मोठ्या संख्येत सर्जरी कॅज्युल्टीबाहेर जमा होऊन गोंधळ घालू लागले. गोंधळ एवढा वाढला की सुरक्षारक्षकांना कॅज्युल्टीचे सर्व प्रवेशद्वार बंद करावे लागले. यादरम्यान सामान्य व्यक्तीच नव्हे तर रुग्णालाही कॅज्युल्टीमध्ये प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांना मेडिसीन कॅज्युल्टीमधून यावे लागले. अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर पुन्हा कॅज्युल्टीचे द्वार सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. गोंधळाची माहिती नाहीरुग्णाच्या नातेवाईकांनी सर्जरी कॅज्युल्टीमध्ये गोंधळ घातला व त्यांना थोपविण्यासाठी प्रवेशद्वार बंद करण्यात आले, अशी कुठलीही माहिती मिळालेली नाही. परंतु तरीही चौकशी केली जात आहे.-डॉ. राजेश गोसावीवैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू