शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

त्रिकूटांच्या सप्तस्वरांची नागपूरकरांवर चढली सांगितिक मोहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:49 IST

बॉलिवूडचा सगळ्यात व्यस्त पार्श्वगायक आणि स्टेज शो परफॉर्मर ‘व्हाईस ऑफ युथ’ शांतनु मुखर्जी अर्थात शान, सोबतीला वाद्यांचा कर्णमधूर साज चढवीत कित्येक सुपरहिट गीतांचा नजराणा देणाऱ्या संगीतकार ‘जतीन-ललित’ जोडगळीतील ललित पंडित आणि ‘मेलोडियस क्वीन ऑफ बॉलिवूड’चा किताब पटकावणारी ज्येष्ठ गायिका साधना सरगम या त्रिकूटाने तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला चार चांद लावत नागपूरकर रसिकांवर सप्तस्वरांची मोहिनी घातली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॉलिवूडचा सगळ्यात व्यस्त पार्श्वगायक आणि स्टेज शो परफॉर्मर ‘व्हाईस ऑफ युथ’ शांतनु मुखर्जी अर्थात शान, सोबतीला वाद्यांचा कर्णमधूर साज चढवीत कित्येक सुपरहिट गीतांचा नजराणा देणाऱ्या संगीतकार ‘जतीन-ललित’ जोडगळीतील ललित पंडित आणि ‘मेलोडियस क्वीन ऑफ बॉलिवूड’चा किताब पटकावणारी ज्येष्ठ गायिका साधना सरगम या त्रिकूटाने तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला चार चांद लावत नागपूरकर रसिकांवर सप्तस्वरांची मोहिनी घातली.  

हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसºया दिवसाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी, डॉ. गिरीश गांधी, महापौर संदीप जोशी, आ. नागो गाणार, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, जयप्रकाश गुप्ता, प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल, भाजपा विदर्भ प्रदेश संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, बाबूराव तिडके, संदीप जाधव, राजेश बागडी, शिवानी दाणी, कीर्तीदा अजमेरा, चेतन कायरकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी, आशिष वांदे, जितू ठाकूर, राहुल खंगर, अर्चना डेहनकर उपस्थित होते. यावेळी साधना सरगम, ललित पंडित व शान यांचा सत्कार करण्यात आला. निवेदन रेणुका देशकर यांनी केले.उद्घाटनानंतर सुरू झालेल्या कार्यक्रमाची सगळी सूत्रे संगीतकार ललित पंडित यांनी घेतली आणि धमाकेदार कार्यक्रमास सुरुवात झाली. तिघांनीही गाजलेली नवी-जुनी गाणी सादर केली आणि त्या गाण्यांच्या निर्मितीची कथा आणि इतर आठवणी सांगत त्रिकुटाने ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’आणखी खुलवला. सुरुवात सहगायिका अनुप्रिया चॅटर्जी हिने ‘मेरे ख्वाबो में जो आये’ या गाण्याने केली आणि सुरुवातीपासूनच रंग चढविण्यास सुरुवात केली. ललित पंडित यांनी स्वत:च्या संगीतकार कारकिर्दीचा इतिहास उलगडताना ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या चित्रपटातील ‘न जाने मेरे दिल को क्या हो गया’ या गाण्याचा किस्सा उजागर केला.हे माझे पहिलेच गाणे लतादीदी यांनी गाऊन माझ्या कारकिर्दीचा शुभारंभ केल्याचे पंडित म्हणाले. विशेष म्हणजे, दोन धृपदाला जोडून हे गाणे चित्रपटात घेण्याचा आग्रह प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते यश चोपडा यांनी केल्यानंतर हे गाणं आकाराला आल्याचे ते म्हणाले. त्यानंतर रंगमंचावर अवतरलेल्या साधना सरगम यांनी छान अस्खलित मराठीत नागपूरकरांशी संवाद साधला तर, चिरपरिचित अंदाजात शानचे रंगमंचावर आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तिघांनीही मिळून सुरेल बॉलिवूड गीतांची बरसात करत नागपूरकर रसिकांना रिझविले. ललित पंडित यांनी संगीत दिलेल्या गाण्यांसोबतच जुन्या गीतांच्या सादरीकरणाने या त्रिकूटाने रसिकांना भुरळ घातली. त्यांना की-बोर्डवर संजय मराठे, रोहांश पंडित, लीड गिटारवर लोकेश बक्षी, ड्रम्सवर जतीन पन्सानिया, तालवाद्यावर अबीर पंडित, ढोलकवर सतीश तामणकर, ऑक्टोपॅडवर संतोष भूतल, बेस गिटावर गौतम शिंदे यांनी संगत केली.‘कसं काय नागपूर... माझा प्लॅनिंग तुम्हाला नक्की आवडेल’पार्श्वगायक शानची जादू युवावर्गावर प्रचंड चालते. याचा अंदाज आज उसळलेल्या युवकांच्या गर्दीवरून घेता येत होता. शानचे आगमन होताच चाहत्यांनी एकच गजर करत स्वागत केले. प्रत्युत्तरात ‘कसं काय नागपूर’ म्हणत शानने रसिकांना आश्चर्यचकित करून सोडले. तुटक तुटक मराठी बोलत ‘माझा प्लॅनिंग तुम्हाला नक्की आवडेल’ असे म्हणत चक्क ‘अश्विनी ये ना, जगू कसा तुझ्या विना राणी गं’ हे धमाकेदार गीत सादर करत नागपूरकर चाहत्यांना थिरकण्यास भाग पाडले.शिवाय, चाहत्यांच्या मनात आजही घर करून असलेली किशोरदा यांची मेलोडियस गाणी सादर करत रसिकांना ताल धरण्यास बाध्य केले. शिवाय, स्वत:च्या आवाजातील गाणी सादर करत नागपूरकरांच्या पसंतीची परीक्षाही त्याने घेतली. ‘चांद शिफारीश जो करता हजारी’ या गीताचा स्वर असा काही लावला की प्रत्यक्ष स्वत: संगीतबद्ध केलेल्या ललित पंडित यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ‘वाह क्या बात है’ अशी दाद निघाली. ‘इथे संत्रा पण हाय आणि संस्कृती पण’ असे म्हणजे नागपूर व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा गौरवही केला.साधनेच्या सरगममध्ये रसिक न्हाऊन निघालेसाधना सरगम यांनी ललित पंडित व शान यांच्यासोबत गाणी सादर करत रसिकांना स्वत:च्या आवाजाची भुरळ पाडली. मराठीमध्ये संवाद साधत नागपूरचे असलेले नाते त्यांनी अधिक घट्ट केले. माझी वहिनी ही नागपूरचीच असल्याने नागपूरविषयीचे आकर्षण नेहमीच राहिल्याचे त्या म्हणाल्या. निले निले अंबर पे, सात समंदर पार मैं तेरे, बस इतना सा ख्वाब है आदी गाणी सादर करत रसिकांच्या मनाचा ताबा लीलया घेतला.ललित पंडित घराण्याची पाचवी संगीतकार पिढीही होती सोबतललित पंडित यांनी स्वत:च्या सांगितिक घराण्याचा परिचय यावेळी करवून दिला. मी नेवाती घराण्यातील माझे गुरू पं. जसराज यांचा पुतण्या असून, आमच्या घराण्यातील पाचवी पिढी म्हणजे माझा मुलगा रोहांश पंडितही संगीत क्षेत्रात कार्यरत आहे आणि तो माझ्यासोबत या महोत्सवात की-बोर्डवर कमाल करत असल्याचा परिचय पंडित यांनी दिला. ज्या प्रमाणे मला तुम्ही आशीर्वाद दिला तसाच आमच्या घराण्याच्या पाचव्या पिढीलाही देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.तिघांनीही मानले नितीन गडकरी व विजय दर्डा यांचे आभार 
दीपप्रज्वलनानंतर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी ललित पंडित, साधना सरगम व शान यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर, पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे बघून तिघांनीही नितीन गडकरी व विजय दर्डा यांचे आभार मानले. आयोजक दीपप्रज्वलन करून निघून जातात आणि कार्यक्रम सुरू असतो. मात्र, गडकरी व दर्डा पूर्णवेळ बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत, असे चित्र आम्ही प्रथमच बघत असल्याचे तिघेही यावेळी म्हणाले.

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिकnagpurनागपूर