रक्तदान करून कोरोनात गमावलेल्या आप्तेष्टांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST2021-07-05T04:06:14+5:302021-07-05T04:06:14+5:30
नागपूर : 'लोकमत रक्ताचं नातं' या मोहिमेअंतर्गत जिंगाबाई टाकळी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कोरोना महामारीमध्ये मृत्यू ओढवलेले ...

रक्तदान करून कोरोनात गमावलेल्या आप्तेष्टांना श्रद्धांजली
नागपूर : 'लोकमत रक्ताचं नातं' या मोहिमेअंतर्गत जिंगाबाई टाकळी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कोरोना महामारीमध्ये मृत्यू ओढवलेले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रामध्ये प्रभावी काम करणारे स्व. जगदीश कोहळे, नामदेव भोरकर, रवि वराडे, राजेश राऊत, रवि तांदुळकर यांना आमदार विकास ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
झिंगाबाई टाकळीचा राजा गणपती माझा, नवयुवक दुर्गाउत्सव मंडळ, गीतांजली शारदा उत्सव मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रम येथे हे शिबिर आयोजित केले. लोकमत व जीवनज्योती ब्लड बँकेच्या चमूने सहकार्य केले.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संजय भिलकर, नागेश राऊत, लक्ष्मणराव वानखेडे, सुभाष मानमोडे, पापाजी शिवपेठ, जगदीश गमे, नितीन कोहळे, कृष्णा गावंडे, अजय इंगोले, राजेश पायतोडे, स्वप्नील पातोडे, गोपालराव शिंगुरकर, रवी वराडे, प्रमोदसिंग ठाकूर, गंगाधरराव घोडमारे, रामूजी कोहळे, राजन बाराई, घनश्याम मांगे, हरीष कानोले, सुखदेव मनोहरे, अविनाश शेरेकर, भानुदास मलवार, जितू नारनेवरे, जगदीश महल्ले, राजू महल्ले, नितीन घोटेकर, दिनेश सुप्रेटकर, उमेश कोहळे, अनिकेत धोटे, गौरव कापसे, निखिल राऊत, मुकुल मोरे, तनमय मांगे, प्रमोद वैद्य, राजेश राऊत इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संस्कार फाउंडेशनतर्फे ग्रामगीता भेट
संस्कार फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रणाली सुभाष मानमोडे यांच्यातर्फे यावेळी रक्तदात्यांची ज्येष्ठांना ग्रामगीता भेट म्हणून देण्यात आली, तर युवकांना सामान्य ज्ञानाचे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पडणारे पुस्तक देण्यात आले.