शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

नागपुरात ११ हजार दिव्यांनी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:28 AM

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना रविवारी ११ हजार दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देसाई ट्रस्टचा कार्यक्रम ‘साईबाबा की जय’चा गजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना रविवारी ११ हजार दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, श्री साईबाबाची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.नागपूर ते शिर्डी पालखी रथयात्रेनिमित्त श्री सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट व साई भक्त साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महालमधील चिटणवीस पार्क येथे १२ वा साई पालखी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शहिदांना श्रद्धांजलीचा हा भव्य कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, गडकरी यांच्या हस्ते साईबाबाची महाआरती करण्यात आली. दरम्यान, देण्यात आलेल्या भारत माता की जय व साईबाबा की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमस्थळी साईबाबाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली होती. यानंतर मुंबई येथील लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरद्वारे ‘गजर साई नामाचा’ हा साई भक्तीगीते व देशभक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, चंद्रकांत शिंदे, संदेश उमप, प्रीती तरोने, मंगेश शिर्के व प्रीतम बावडे यांनी एकाहून एक सरस गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तुषार सावंत यांनी निवेदन केले. याप्रसंगी साई म्युझिकल ग्रुप, मैत्री परिवार, सिंधू युवा फोर्सच्या कार्यकर्त्यांसह साईभक्तीला वाहून घेतलेल्या सेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली होती. मेडिकलचे डॉ. संजय पराते यांनी यासाठी सहकार्य केले. शेकडो भाविकांनी साईसेवा म्हणून रक्तदान केले. शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात पंकज महाजन, श्रीकांत आगलावे, संजय भेंडे, संजय बालपांडे, चंदू पेंडके, राजू जयस्वाल, डॉ. नखाते, मोहन चव्हाण, आशिष चिरकुटे, सोनू खिरेकर, दुर्गेश ढाकुलकर, भूषण परसोडकर, विजय भोयर, रोहित घाटोळे, अनुपम बलकी, स्नेहल कुचनकर, शुभम कुबडे, रमेश बोरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला